राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील सेवा रस्त्याच्या चिंधड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:14+5:302021-01-08T06:09:14+5:30

पाचवड : आपण एखाद्या खेडेगावामधील, गल्ली-बोळातील रहदारीचे रस्ते उखडलेले आजपर्यंत पाहिले असतील. मात्र, इथे तर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ...

National Highway No. 4 above service road rags | राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील सेवा रस्त्याच्या चिंधड्या

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील सेवा रस्त्याच्या चिंधड्या

googlenewsNext

पाचवड : आपण एखाद्या खेडेगावामधील, गल्ली-बोळातील रहदारीचे रस्ते उखडलेले आजपर्यंत पाहिले असतील. मात्र, इथे तर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील उडतारे ते वीरमाडे दरम्यान असलेल्या सेवारस्त्याच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या आहेत. हा सुमारे २०० मीटर अंतराचा रस्ता भेगाळलेला आहे. पावसाळ्यामध्ये उद्ध्वस्त होऊन खचलेल्या रस्त्याची गेल्या तीन ते चार महिन्यांत कोणतीही डागडुजी न झाल्याने या रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराच्या कामाचा निकृष्ट दर्जा व गलथानपणा पुन्हा एकदा लोकांसमोर आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ चे सहापदरीकरणाचे काम त्याच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच प्रश्नांकित राहिले आहे. भुईंजमधील उड्डाणपूल ढासळणे, पाचवडमधील उड्डाणपुलास पडलेली भगदाड, सुरुरमधील अजूनही थरकाप करणारा उड्डाणपूल अशा अनेक घटनांनी या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची जणू साक्षच दिली आहे. यावर आता कळस म्हणजे उडतारे ते वीरमाडे दरम्यान पावसाळ्यात उद्ध्वस्त झालेला सुमारे २०० मीटर लांबीचा सेवारस्ता. या सेवारस्त्याची इतकी भयानक स्थिती झाली आहे की, जणू काही या ठिकाणी मोठा भूकंप झाला आहे. या रस्त्यावरून नागरिकांनी, येथील शेतकऱ्यांनी चालत ये - जा करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. तरीही संबंधितांनी पावसाळा संपल्यानंतर या गंभीर बाबीची कोणतीही दखल न घेता या रस्त्याच्या डागडुजीकडे कानाडोळा केलेला दिसून येत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक लोकांना यमसदनी धाडणारा महामार्ग या घटनेने आणखी किती निष्पाप लोकांचे बळी घेणार आहे, अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

चौकट

सेवा रस्ता दुरुस्त न केल्यासा आंदोलन

सेवा रस्त्याचा उपयोग वीरमाडे, उडतारे, आनेवाडी येथील शेतकरी व नागरिक करतात. मात्र, हा रस्ताच उद्ध्वस्त झाल्याने रस्त्याकडेला असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल शेताबाहेर काढता येत नाही. त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. भविष्यात येथे काही अनुचित घटना घडल्यास त्यास संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरावे व या सेवारस्त्याची डागडूजी त्वरित न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील शेतकरी व नागरिकांनी दिला आहे.

Web Title: National Highway No. 4 above service road rags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.