राष्ट्रीय लोकअदालतीचे १० एप्रिल रोजी आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:37+5:302021-03-04T05:14:37+5:30
सातारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्यावतीने शनिवार, दि. १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्हा न्यायालय, सातारा ...
सातारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्यावतीने शनिवार, दि. १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्हा न्यायालय, सातारा व तालुकास्तरीय न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तृप्ती जाधव यांनी दिली.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील सर्वप्रकारची प्रलंबित प्रकरणे म्हणजेच सर्व दिवाणी व फौजदारी (तडजोडपात्र गुन्हे), भूसंपादन नुकसानभरपाईची प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांची नुकसान व वसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्टस अॅक्टच्या कलम १३८ खाली दाखल झालेली प्रकरणे, महसूलबाबतची प्रकरणे, कामगार वाद, वन कायदा व सर्व तडजोडपात्र प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. या लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तृप्ती जाधव यांनी केले आहे.