राष्ट्रीय पोषण पंधरवडानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:38+5:302021-04-03T04:35:38+5:30

किडगाव : एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजनेंतर्गत व सातारा येथील वर्ये बिटातील वर्ये (ता. सातारा) येथील ...

National Nutrition Fortnight Program | राष्ट्रीय पोषण पंधरवडानिमित्त कार्यक्रम

राष्ट्रीय पोषण पंधरवडानिमित्त कार्यक्रम

Next

किडगाव : एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजनेंतर्गत व सातारा येथील वर्ये बिटातील वर्ये (ता. सातारा) येथील अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय पोषण पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, नवविवाहिताचे स्वागत, गरोदर मातांचे ओटीभरण, ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’अंतर्गत मुलींच्या जन्माचे स्वागत, आदी उपक्रम बाल विकास प्रकल्प अधिकारी शैला खामकर-सापते यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात झाले.

यावेळी समतोल पोषण आहारावर विविध भाज्या, फळे, पदार्थ व पूरक धान्यांवर आधारित प्रदर्शन भरविण्यात आले होते. पर्यवेक्षिका कांबळे यांनी उपस्थितांना आहार, आरोग्य व लसीकरण यांबद्दल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सरपंच राहुल पोळ, उपसरपंच संगीता निकम, ग्रामसेविका प्रज्ञा माने, रोहिणी जगताप, रेखा निकम, योगिता बांदल, उषा साबळे, नवनाथ ननावरे, विशाल ननावरे, बबन निकम, आदी उपस्थित होते. सेविका राणी पठारे यांनी सूत्रसंचालन केले. इंदुमती भापकर यांनी आभार मानले.

०२किडगाव

फोटो : गरोदर मातांचे ओटीभरण करताना पर्यवेक्षिका सुलभा कांबळे, इंदुमती भापकर, राणी पठारे, योगिता बांदल, आदी उपस्थित होते.

Web Title: National Nutrition Fortnight Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.