राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत साताऱ्यातील ७ खेळाडू चमकले, यश कदम, पौर्णिमा कारंडे याना कांस्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:56 PM2018-01-02T14:56:31+5:302018-01-02T15:00:52+5:30
तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया व पंजाब तायक्वांदो स्टेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जालंधर (पंजाब) येथे पार पडलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सिद्धांत सोळंखी, यश कदम, अनिकेत वरनारायण, पारस सपकाळ, पौर्णिमा कारंडे, अपूर्वा मुंद्रावळे, जिग्नेश गुजर सात खेळाडू चमकले.
सातारा : तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया व पंजाब तायक्वांदो स्टेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जालंधर (पंजाब) येथे पार पडलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत जिल्ह्यातील सात खेळाडू चमकले.
सिद्धांत सोळंखी, यश कदम, अनिकेत वरनारायण, पारस सपकाळ, पौर्णिमा कारंडे, अपूर्वा मुंद्रावळे, जिग्नेश गुजर अशी यशस्वी खेळाडूंची नावे आहेत. यश कदम याने ३८ किलो ग्रॅम गटामध्ये कांस्य पदक व पौर्णिमा कारंडे ६१ किलो ग्रॅम गटात कांस्य पदक मिळविले.
या खेळाडूंना प्रमुख कोच विजय खंडाईत, हणमंत भोसले, राहुल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैय्यालाल राजपुरोहित, शिवाजी उदयन मंडळाचे अध्यक्ष गुरुवर्य बबनराव उथळे, नीलेश कुमठेकर, एस. एन. भगत, दशरथ निकम, संजय पवार, शानभाग विद्यालयाचे अभिजित मगर यांनी कौतुक केले.