राष्ट्रीय मतदार दिनी साताऱ्यात झाला विक्रम, मानवी प्रतिमांचा भारतीय नकाशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 04:58 PM2019-01-25T16:58:33+5:302019-01-25T17:07:43+5:30
राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आज साताऱ्यात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भव्य मानवी प्रतिमांचा भारतीय नकाशा साकारण्यात आला. यावेळी " मतदान करा " हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात आला.
सातारा : राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आज साताऱ्यात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भव्य मानवी प्रतिमांचा भारतीय नकाशा साकारण्यात आला. यावेळी " मतदान करा " हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात आला.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त साताऱ्यात १२०० विद्यार्थ्यांनी २०० x २०० फुट आकाराचा भारताचा भव्य नकाशा साकारला.
यासाठी ग्लोबल रेकॉर्ड & रिसर्च फौंडेशन चिलड्र्न रेकॉर्डच्या वतीने विश्व विक्रमाचे प्रमाण पत्र जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे , जिल्हा उपनिवडणूक अधिकारी पुनम मेहता हे उपस्थित होते.