खंडाळ्यात राष्ट्रवादीने पाळला आघाडी धर्म

By admin | Published: March 14, 2017 10:49 PM2017-03-14T22:49:38+5:302017-03-14T22:49:38+5:30

सभापतिपदी राष्ट्रवादीचे मकरंद मोटे : उपसभापतिपदी कॉँग्रेसच्या वंदना धायगुडे यांची निवड

Nationalist Congress Party plays a leading religion | खंडाळ्यात राष्ट्रवादीने पाळला आघाडी धर्म

खंडाळ्यात राष्ट्रवादीने पाळला आघाडी धर्म

Next



खंडाळा : खंडाळा पंचायत समितीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी धर्माचे पालन करीत सत्ता स्थापन केली. सभापतिपदी राष्ट्रवादीचे मारुती ऊर्फ मकरंद मोटे तर उपसभापतिपदी काँग्रेसच्या वंदना धायगुडे-पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी आ. मकरंद पाटील यांनी घालून आपला दबदबा कायम राखला.
खंडाळा पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मकरंद मोटे, अश्विनी पवार आणि राजेंद्र तांबे असे तीन सदस्य निवडून आले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीला एका सदस्याच्या पाठिंब्याची गरज होती. वास्तविक, राष्ट्रवादी पुढे शोभा जाधव आणि चंद्रकांत यादव या दोन्ही अपक्षांचा पर्याय उपलब्ध होता. मात्र, आमदार मकरंद पाटील यांनी काँग्रेसला बरोबर घेण्याचा निर्णय घेऊन निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द पाळला.
खंडाळा पंचायत समितीच्या सभागृहात आज राष्ट्रवादीचे तीन सदस्य व काँग्रेसचे एक सदस्य यांनी चौघांनी एकत्रित येऊन सभापतिपदासाठी नायगाव गणातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे मकरंद मोटे तर उपसभापतिपदासाठी खेड गणातून काँग्रेसच्या वंदना धायगुडे-पाटील यांचे अर्ज दाखल केले. पुरेसे संख्याबळ नसल्याने चंद्रकांत यादव यांना उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे दोन्ही अपक्ष तटस्थ राहिले.
गेली पंचवीस वर्षे धनगरवाडी गावचे सरपंच असलेले मकरंद मोटे यांना पहिल्याच प्रयत्नात सभापतिपद मिळाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पदाधिकारी निवडीवेळी तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, दीपाली साळुंखे, उदय कबुले, अ‍ॅड . शामराव गाढवे, लताताई नरुटे, बंडा साळुंखे, राजेंद्र चव्हाण, अजय भोसले, अजय धायगुडे, नामदेवराव धायगुडे, दत्तात्रय बिचुकले, संभाजी घाडगे, चंद्रकांत पाचे, सुभाषराव भोसले, गुरुदेव बरदाडे उपस्थित होते. नूतन सभापती व उपसभापती यांना निवडणूक अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार शिवाजी तळपे, गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Nationalist Congress Party plays a leading religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.