राष्ट्रवादीकडून पेट्रोल पंपाची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 10:42 PM2018-06-01T22:42:44+5:302018-06-01T22:42:44+5:30

Nationalist Congress Party's endeavor | राष्ट्रवादीकडून पेट्रोल पंपाची अंत्ययात्रा

राष्ट्रवादीकडून पेट्रोल पंपाची अंत्ययात्रा

Next


सातारा : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध करत तसेच मोदी सरकारवर आगपाखड करत राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या वतीने शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर पेट्रोल पंपाची अंत्ययात्रा काढण्यात आली.
आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ‘मोदी सरकार हाय हाय’च्या घोषणाही यावेळी करण्यात आल्या.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल पंपाची प्रतिकृती तिरडीवर ठेवण्यात आली होती. सुनील माने व तेजस शिंदे यांनी पुढे खांदा देऊन ही तिरडी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणली. इतर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
गेल्या चार वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना सरकार आघाड्यांवर स्प्ोशल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन त्यांनी राज्याच्या जनतेची फसवणूक केली आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, लहान व्यावसायिक, शिक्षक व डॉक्टर अशा सर्वच थरांमध्ये या सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केंद्रातील सरकारच्या नोटबंदी व जीएसटीच्या आतताई निर्णयांमुळे देशाची व राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. फसवी कर्जमाफी, सामाजिक विचारांची हत्या, शिक्षणाचा बाजार, थकीत शिष्यवृत्ती, वाढती बेरोजगारी आदी समस्यांनी सामान्य नागरिक त्रस्त आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
दरम्यान, हा प्रतीकात्मक पुतळा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आणल्यानंतर त्यासमोर मडके फोडून तीव्र घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी पोलिसांनी प्रवेशद्वार बंद ठेवले होते. प्रवेशद्वार उघडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुतळ्याच्या प्रतिकृतीला लाथांचा मार
पेट्रोल पंपाची प्रतिकृती तिरडीवर ठेवून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. तेथे त्यांनी तिरडी खाली ठेवल्यानंतर पेट्रोल पंपाच्या प्रतिकृतीला लाथा-बुक्क्या मारण्यात आल्या. कार्यकर्ते चवताळून लाथा मारत संताप व्यक्त केला.

Web Title: Nationalist Congress Party's endeavor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.