वादळी वाऱ्यासह पाऊस : ‘निसर्ग’ने केला सातारा ‘लॉकडाऊन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:32 PM2020-06-03T23:32:40+5:302020-06-03T23:33:45+5:30

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसाने शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच बुधवारी निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका जिल्ह्यासह सातारा शहराला बसला. सकाळपासूनच सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस सुरू झाला.

‘Nature’ did Satara ‘Lockdown’! | वादळी वाऱ्यासह पाऊस : ‘निसर्ग’ने केला सातारा ‘लॉकडाऊन’!

वादळी वाऱ्यासह पाऊस : ‘निसर्ग’ने केला सातारा ‘लॉकडाऊन’!

googlenewsNext
ठळक मुद्देरस्ते जलमय, ठिकठिकाणी वृक्ष उन्मळले; घरांमध्ये शिरले पाणी; ‘कास’च्या पाणीसाठ्यात वाढ

सातारा : निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीसह संपूर्ण राज्यात हाहाकार माजविला असताना साताºयातही बुधवारी दिवसभर वादळी वाºयासह जोरदार सरी बरसल्या. लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने गर्दीने गजबजणारा सातारा ‘निसर्ग’ने पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’ केला. हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिल्याने सातारकरांनी संपूर्ण दिवस घरातच काढला. या पावसाने काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर ठिकठिकाणी महाकाय वृक्ष उन्मळून पडले.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसाने शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच बुधवारी निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका जिल्ह्यासह सातारा शहराला बसला. सकाळपासूनच सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. वादळी वाºयामुळे जिल्हा रुग्णालय परिसर, पंचपाळी हौद, अजिंक्यतारा किल्ला परिसरात महाकाय वृक्ष उन्मळून पडले. परिणामी जिल्हा रुग्णालय मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

घरांसह इमारतींवर पत्रेही वाºयामुळे उडून गेले. सदर बझार, गोडोली, कोडोली येथील काही दुकाने व घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे ्रप्रचंड नुकसान झाले. पुणे-बंगलोर महामार्गावरील वाहतूकही पावसामुळे ठप्प झाली. हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिल्याने सातारकर घरातून बाहेरच पडले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लॉकडाऊनच्या अटी शिथिल केल्याने गर्दीने गजबजणारी बाजारपेठ चक्रीवादळामुळे ‘लॉकडाऊन’ झाल्याचे चित्र दिसून आले. दुपारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पालिकेकडून ओढे, नाले स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले.


बाजारपेठत शुकशुकाट
लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने साताऱ्याची बाजारपेठ नागरिकांसाठी खुली झाली आहे. परंतु बुधवारी बहुतांश नागरिकांनी खरेदीकडे पाठ फिरविली. ग्राहकच नसल्याने दुकानदारांनी दुपारनंतर दुकाने बंद ठेवली. रस्त्यावर बसून भाजी विक्री करणारे शेतकरी व फळविक्रेत्यांचे पावसाने प्रचंड नुकसान झाले.

ओढे, नाले तुडुंब
दुपारी साडेबारानंतर पावसाचा जोर अचानक वाढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढे व नाले कचºयाने तुडुंब भरल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसामुळे सदर बझार, माची पेठ व बोगदा परिसरात रस्त्यावर खडी वाहून आल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.

रस्ते पडले ओस
जिल्हा प्रशासनाने धोक्याची सूचना दिल्याने सातारकरांनी घरातच राहणे पसंद केले. बहुतांश दुकाने दुपारनंतर बंद झाल्याने खणआळी, मोती चौक, ५०१ पाटी, राजपथ, समर्थ मंदिर, पोवई नाका व बसस्थानक या मार्गावरील रस्ते ओस पडले होते.

धबधबा कोसळू लागला
सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या कास परिसराला सोमवारी वादळी वाºयासह पावसाने अक्षरश: झोडपूून काढले. पावसाची संततधार दिसवभर सुरू होती. पठाराच्या कड्यावरून पाणी वाहू लागल्याने तलावाकडील छोटे धबधबे कोसळू लागले आहेत. पारंबे फाट्यापासून चार किलोमीटर अंतरावर असलेला एकीव धबधबाही पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे.

वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प
वाºयामुळे विजेचे खांब वाकल्याने व वीजवाहिन्या तुटल्याने सातारा शहर व परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसातही दुरुस्ती मोहीम हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत केला. जिल्हा रुग्णालय मार्गावर वृक्ष कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती.

वाहनधारकांची धांदल
प्रशासनाने धोक्याचा इशारा देऊनही काही नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. पाऊस सुरू होताच सर्वांची धावपळ उडाली. वाहनधारकांनाही पावसामुळे तारेवरची कसरत करावी लागली. पाऊस व वाºयाचा वेग अधिक असल्याने बहुतांश वाहनधारकांनी वाहन चालविण्याचे धाडसच केले नाही.

 

Web Title: ‘Nature’ did Satara ‘Lockdown’!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.