सुर्ली घाटात निसर्गाला बहर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 03:12 PM2017-09-21T15:12:21+5:302017-09-21T15:16:01+5:30
हिरव्या वनराईने नटलेले डोंगर, स्वच्छ खळखळते झरे, खोल खोल दºया, पारदर्शक पाण्याचे तळे व मस्त झोंबणारा थंडगार वारा असा सगळा मन प्रसन्न करणारा परिसर सुर्ली घाटात आहे. याचा आनंद लुटण्यासाठी पर्यकांचा ओढा वाढत आहे. तरूणाईची पहली पसंती या घाटातील पर्यटनला मिळत असल्याने या परिसरात पर्यटन वाढत असल्याचे दिसते.
ओगलेवाडी (जि. सातारा)21 : हिरव्या वनराईने नटलेले डोंगर, स्वच्छ खळखळते झरे, खोल खोल दºया, पारदर्शक पाण्याचे तळे व मस्त झोंबणारा थंडगार वारा असा सगळा मन प्रसन्न करणारा परिसर सुर्ली घाटात आहे. याचा आनंद लुटण्यासाठी पर्यकांचा ओढा वाढत आहे. तरूणाईची पहली पसंती या घाटातील पर्यटनला मिळत असल्याने या परिसरात पर्यटन वाढत असल्याचे दिसते.
कºहाड आणि कडेगाव तालुक्याच्या हद्दीवर सुर्ली घाट आहे. तिव्र उतार आणि वेडीवाकडी वळणे या घाटात आहेत. निसर्गाने या परिसराला भरभरून दिले आहे. मुक्तहस्ताने निसर्गाने केलेली उधळण पाहण्यासाठी येथे येणाºया पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे निसर्गाबरोबरच पर्यटनालाही बहर आल्याची सद्या येथे परिस्थिती आहे.
सद्या पावसाळा सुरू असून निसर्गाला सर्वत्र बहर आला आहे. हे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेकजण पावसाळ्यात पर्यटन करतात. अनेक किलोमीटर प्रवास करून निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आजकालची तरूणाई प्रयत्नशील असते. अशा तरूणाईसाठी आता एक नवीन आणी जवळचे ठिकाण साद घालीत आहे. ते ठिकाण म्हणजे सुर्ली घाट परिसर. हिरवळीने नटलेला हा परिसर तरूणाईचा आवडता स्पॉट बनला आहे.
कºहाडपासून पूर्वेला १५ किलोमिटर अंतरावर हा घाट आहे. हिरव्यागार वनराईने झाकलेले डोंगर, खळखळते झरे, स्वच्छ पाण्याचे तळे, जानाई देवीचे सुंदर मंदीर आणि थंडगार वारा असा सगळा पर्यटनाचा मसाला व घाट माथ्यावर खवय्यांसाठी सोय यामुळे हा परिसर सर्वांचे आकर्षण ठरत आहे. महाविद्यालयीन तरूणांसाठी हा परिसर आवडीचा स्पॉट बनला आहे. या परिसरात सेल्फीसाठी अनेक जागा असल्याने सेल्फी प्रेमींसाठी हा घाट पर्वणीच आहे.
टेहळणी मनोºयाची आवश्यकता
सुर्ली घाट परिसरातून खूप दूरवरचा प्रदेश सहज पाहता येतो. येथील टेकडीवरून कºहाड परिसराचे विहंगमदृष्य नजरेत भरते. याच टेकडीवर एखादा निरीक्षण मनोरा उभारल्यास आणखी दूरवरचा प्रदेश आणि कृष्णा नदीचा प्रवाह न्याहाळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.