किडगावचे नाट्य मंडळ अमृतमहोत्सवाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 07:54 PM2019-05-19T19:54:29+5:302019-05-19T19:54:33+5:30

गुलाब पठाण । लोकमत न्यूज नेटवर्क किडगाव : खेड्यांमधील यात्रांमध्ये नाटक हे एकमेव करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जात होते. ...

The Natyam Mandal of Kiggaon, Amritam Mahotsav | किडगावचे नाट्य मंडळ अमृतमहोत्सवाकडे

किडगावचे नाट्य मंडळ अमृतमहोत्सवाकडे

Next


गुलाब पठाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
किडगाव : खेड्यांमधील यात्रांमध्ये नाटक हे एकमेव करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जात होते. शेतीवाडीची कामे झाल्यानंतर गावाकडे ग्रामदेवतेची यात्रा भरवली जाते. या यात्रेत गावकरी आणि पाहुणे मंडळींच्या करमणुकीचे साधन म्हणून गावपातळीवर छोटी-छोटी नाटके कला पथकांचे आयोजन केले जात होते. काळ बदलला, काळाबरोबर माणसंही बदलली. माणसांबरोबर करमणुकीची साधनेही बदलली; मात्र याला किडगाव हे अपवाद ठरले. येथील विजय नाट्य मंडळ अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.
किडगावची ओळख वेगळीच आहे. दरवर्षी वैशाख पौर्णिमेला गावची वार्षिक यात्रा भरते. यात्रेनिमित्त लोकांच्या करमणुकीसाठी ब्रिटिश कालखंडापूर्वीपासून ते आजपर्यंत अखंडितपणे नाट्यकला जपण्याचं काम विजय नाट्यमंडळाने केले आहे. यंदा ‘राजकारणात रंगली ग्रामपंचायत’ या विनोदी नाटकाचे आयोजन केले आहे.
तमाशाप्रधान कार्यक्रमांना स्त्रियांना उपस्थिती राहता येत नाही. हे लक्षात घेऊन गावातील तरुण नाट्य कलाकारांनी एकत्रित येऊन या नाट्य मंडळाची स्थापना केली. तो कालखंड अत्यंत कठीण होता. नाटकासाठी वीज किंवा ध्वनिक्षेपकाची सुविधा नव्हती. अशावेळी गॅसबत्तीचा उजेड आणि विनास्पीकरची नाटकही लोकप्रिय ठरली, असे जाणकार आवर्जून सांगतात.
सुरुवातीला रामचंद्र शिर्के, शंकर ढेंबरे, आनंद ढेंबरे, हणमंत इंगवले, अजमुद्दिन भालदार, बाबू बाळू कुंभार, आनंदराव टिळेकर, मनोहर इंगवले, नारायण इंगवले आणि असंख्य मंडळीमणी हिरिरीने भाग घेऊन नाट्यपरंपरा जपली.
ऐंशी टक्के घरातून कलाकार
गावातील जवळपास ८० टक्के घरातून कलावंत तयार झालेला दिसून येतो. यामध्ये मानसिंग इंगवले, विठ्ठल लोहार, आनंदराव इंगवले, हणमंत इंगवले, जगन्नाथ टिळेकर, सुदाम शिंदे, विश्वास शिंदे, वजीर पठाण, नंदकुमार इंगवले, अशोक ढेंबरे, जगन्नाथ शेडगे, बाबूराव पवार, मुबारक शेख, सिकंदर पठाण, राजेंद्र शिर्के, वसंत धुमाळ, प्रदीप इंगवले, देवेंद्र इंगवले, मंजुरेआलम पठाण, मोहन सोनटक्के, महादेव सोनटक्के, गुलाब इंगवले, रमेश इंगवले, बजरंग इंगवले यांनी नाट्यपरंपरा जपली.

Web Title: The Natyam Mandal of Kiggaon, Amritam Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.