‘नवदुर्गा’ रॅलीनं घुमलं मराठा वादळ !

By admin | Published: October 1, 2016 12:14 AM2016-10-01T00:14:26+5:302016-10-01T00:19:41+5:30

दोन हजार महिलांच्या बाईक्स रस्त्यावर: साताऱ्याच्या मुख्य रस्त्यांवर घुमली ‘लेडीज बुलेट’; नऊवारी साडी अन् भगव्या फेट्यांमुळं अनोखं दृष्य--महामोर्चाची महातयारी

'Navdurga' rolled out maratha storm! | ‘नवदुर्गा’ रॅलीनं घुमलं मराठा वादळ !

‘नवदुर्गा’ रॅलीनं घुमलं मराठा वादळ !

Next

सातारा : नवरात्रोत्सवाचा आदल्या दिवशी नवदुर्गेचा आधुनिक अवतार अवघ्या साताऱ्यानं पाहिला. नऊवारी साडी, नाकात नथ अन् डोक्यावर भगवे फेटे घातलेल्या हजारो तरुणी, महिलांनी साताऱ्यातील मुख्य रस्त्यावरून शुक्रवारी दुचाकीवरून महारॅली काढली. रॅलीत दीड ते दोन हजार महिला, युवती सहभागी झाल्या होत्या. कर्तव्य सोशल गु्रपच्या वेदांतिकाराजे भोसलेही यात सहभागी झाल्या होत्या.
साताऱ्यात सोमवारी मराठा महामोर्चा काढण्यात येणार आहे. महामोर्चाला तीनच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी साताऱ्यातील मुख्य रस्त्यावरून महारॅली काढली.
छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलपासून रॅलीला सुरुवात झाली. पोवई नाका, राजपथ मार्गे राजवाडा, तेथून पोलिस मुख्यालय मार्गे पोवई नाक्याहून रॅली जिल्हा क्रीडा संकुलात आली. त्याठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. हजारो दुचाकीवरून सहभागी झालेल्या महिलांनी ‘एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी,’ या घोषणा दिल्या.
मुख्य रस्त्यावरून रॅली जात असताना नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. महामोर्चात काही तरुणी बुलेट घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यांनी बुलेटला भगवा झेंडा लावला होता. (प्रतिनिधी)


जिप्सीतून बालशिवाजी
दुचाकी रॅलीमध्ये एका जिप्सीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली चिमुरडीही सहभागी झाली होती. हे बालशिवाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

डोंगरकपारीतही ‘एक मराठा, लाख मराठा’
ढेबेवाडीत दुचाकी रॅली : महामोर्चात सहभागी होण्याचे मराठा बांधवांना आवाहन

महामोर्चासाठी सोमवारी वाहतुकीत बदल
पोलिसांकडून उपाययोजना : पोलिस अन् रुग्णवाहिकांसाठी काही मार्ग राखीव

Web Title: 'Navdurga' rolled out maratha storm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.