ट्रकच्या धडकेत नवविवाहिता जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:07 PM2019-07-09T12:07:54+5:302019-07-09T12:10:30+5:30

सातारा मार्गावर जवळवाडी गावानजीक दुचाकी खड्ड्यात आदळून मागील सीटवर बसलेली भाग्यश्री गणेश जाधव (वय २३, रा. मोरावळे, ता. जावळी) ही नवविवाहिता रस्त्यावर पडली, दरम्यान, याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने तिला धडक दिल्याने यात तिचा जागीच मृत्यू झाला. केवळ एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या भाग्यश्रीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला.

Nawabita killed in place of truck | ट्रकच्या धडकेत नवविवाहिता जागीच ठार

ट्रकच्या धडकेत नवविवाहिता जागीच ठार

googlenewsNext
ठळक मुद्देट्रकच्या धडकेत नवविवाहिता जागीच ठारखड्ड्यामुळे आणखी किती बळी जाणार ?

मेढा : सातारा मार्गावर जवळवाडी गावानजीक दुचाकी खड्ड्यात आदळून मागील सीटवर बसलेली भाग्यश्री गणेश जाधव (वय २३, रा. मोरावळे, ता. जावळी) ही नवविवाहिता रस्त्यावर पडली, दरम्यान, याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने तिला धडक दिल्याने यात तिचा जागीच मृत्यू झाला. केवळ एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या भाग्यश्रीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, रिटकवली गावचे माजी सरपंच सर्जेराव मर्ढेकर यांची मुलगी भाग्यश्री हिचा विवाह ३१ मे २०१९ रोजी मोरावळे येथील गणेश जाधव यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर आषाढ (आखाड ) पाळण्यासाठी भाग्यश्री ही माहेरी चार दिवसांपूर्वी रिटकवली येथे आली होती.

सोमवारी मेढ्याचा बाजार असल्याने सर्जेराव मर्ढेकर हे आपली मुलगी भाग्यश्री हिला घेऊन दुचाकीवरून मेढा येथे गेले होते. किराणा बाजार खरेदी केल्यानंतर दोघेजण रिटकवलीकडे दुचाकीवरून येत होते. मेढा- सातारा मार्गावर जवळवाडी गावाच्या स्वागत कमानी नजीक हे दोघे आले असता रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यात त्यांची दुचाकी जोरदार आदळली. त्यामुळे पाठीमागे बसलेली भाग्यश्री गाडीवरून खाली पडली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने ( एमएच ४२ बी ८५०८) तिला धडक दिली. तिच्या डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. भाग्यश्रीचे वडील सर्जेराव मर्ढेकर हे सुद्धा जखमी झाले.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक कासम उस्मान मुलाणी( रा. बुध,ता खटाव) याला वेण्णानगर येथून ताब्यात घेतले. भाग्यश्रीचा विवाह होऊन अवघा एक महिनाच झाला होता. सासरी पाठवणी करत नांदा सौख्यभरे असा आशीर्वाद देणाऱ्या पित्यावरच तिला अखेरचा निरोप देण्याची दुर्देवी वेळ आली. रिटकवली या गावी भाग्यश्रीचा मृतदेह नेताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ग्रामस्थांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

खड्ड्यामुळे आणखी किती बळी जाणार ?

मेढा- सातारा रस्त्यासह तालुक्यात रस्त्याची झालेली चाळण व रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यामुळे आणखी किती बळी पडणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. आणखी बळी जाण्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे तातडीने मुजवावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
 

Web Title: Nawabita killed in place of truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.