‘एनसीइआरटी'ने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला, अंनिस राबवणार प्रबोधन अभियान

By नितीन काळेल | Published: May 3, 2023 07:30 PM2023-05-03T19:30:01+5:302023-05-03T19:30:28+5:30

सातारा : ‘एनसीइआरटीने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ‘अंनिस’ याचा निषेध करत आहे. त्याचबरोबर ...

NCERT' has dropped the section on the science of evolution from the 10th syllabus, Annis will conduct awareness campaign | ‘एनसीइआरटी'ने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला, अंनिस राबवणार प्रबोधन अभियान

‘एनसीइआरटी'ने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला, अंनिस राबवणार प्रबोधन अभियान

googlenewsNext

सातारा : ‘एनसीइआरटीने दहावी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ‘अंनिस’ याचा निषेध करत आहे. त्याचबरोबर याचा निषेध कृतीतून व्यक्त करण्यासाठी ‘अंनिस’ ‘चला उत्क्रांती समजून घेऊया’ हे अभियान राबविणार आहे,’ अशी माहिती डाॅ. हमीद दाभोलकर यांनी दिली.
याबाबत महाराष्ट्र ‘अंनिस’च्या वतीने डाॅ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार आणि वंदना माने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

यामध्ये म्हटले आहे की, एनसीइआरटीने दहावीच्या अभ्यासक्रमातून उक्रांतीचा विज्ञान सांगणारा भाग वगळल्याची माहिती समोर आली आहे. अनुवांशिकता आणि उत्क्रांती विषयी दहावीच्या अभ्यासक्रमात असलेला भाग वगळून त्याजागी केवळ अनुवांशिकता एवढाच भाग ठेवलेला आहे. अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याचा अंनिस निषेध करत आहे. कारण, पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पती कशी झाली याची शास्त्रीय मांडणी उत्क्रांतीच्या सिद्धांताद्वारे केली जाते.

टप्प्याटप्प्याने एक पेशीय प्राणी त्यानंतर बहुपेशीय प्राणी, मानवाचे आधीच्या टप्प्यावरील माकड आणि सर्वात शेवटी मानव अशा टप्प्यांमधून मानवी उत्क्रांती कशी झाली यांची शास्त्रीय माहिती यामध्ये दिली जाते. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यामागे कोणतीही विशिष्ट शक्ती नाही. उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून ती झाली आहे. ही माहिती शालेय वयातील मुलांना पहिल्यांदा उत्क्रांतीच्या सिद्धांतातून मिळते.

मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक अंधश्रद्धाची निर्मिती ही मानवी जीवनाचा उगम कसा झाला याची योग्य माहिती नसल्याने होतो. त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत शालेय अभ्यासक्रमातून शिकवल्याने विद्यार्थ्यांची मानवी जीवनाच्या उत्पत्तीमागे असलेल्या विज्ञानवादी भूमिकेशी तोंड ओळख होते. प्रत्यक्षात सहावी, सातवीच्या विद्यार्थ्याला याविषयी प्रश्न पडू लागतात. त्यामुळे तेव्हापासून टप्प्याटप्प्याने याविषयी माहिती शालेय अभ्यासक्रमातून येणे आवश्यक आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत शालेय पुस्तकांमधून वगळल्यामुळे मुलांमध्ये विज्ञानवादी मानसिकता निर्माण होण्यात अडथळा निर्माण होणार आहे.

भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये उत्क्रांती सिद्धांत जीव शास्त्रातील मुलभूत सिद्धांत म्हणून शिकवला जातो. उत्क्रांतीविषयी विशेष कोर्सही शिकवले जातात. या पार्श्वभूमीवर उत्क्रांतीचा सिद्धांत दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळल्यामुळे दहावीनंतर विज्ञान शाखा घेणार नाहीत. त्या विद्याऱ्थांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची माहिती मिळणार नाही. देशभरतील १८०० वैज्ञानिकांनी या गोष्टीला विरोध नोंदवला आहे. त्याला महाराष्ट्र अंनिस पाठींबा देत आहे, असेही या पत्रकात स्पष्ट केले आहे. या पत्रकावर अंनिस पदाधिकारी भगवान रणदिवे, डॉ. दीपक माने, हौसेराव धुमाळ, शंकर कणसे,, विलास भांदिर्गे, कुमार मंडपे आणि प्रमोदिनी मंडपे यांच्या सह्या आहेत.


चला उत्क्रांती समजून घेऊया अभियानातील मुद्दे...

  • उत्क्रांती विषयावर शालेय मुलांसाठी पुस्तिका प्रकाशन
  • विज्ञान शिक्षकांसाठी उत्क्रांती विषयावर कार्यशाळा
  • एनसीइआरटीला उत्क्रांती विषय शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहिण्याची मोहीम
  • महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उत्क्रांती विषयावर मांडणी करणाऱ्या प्रशिक्षित वक्त्यांचे नेटवर्क उभे करणे

Web Title: NCERT' has dropped the section on the science of evolution from the 10th syllabus, Annis will conduct awareness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.