‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते चक्क सायकलवर..

By admin | Published: December 6, 2015 10:58 PM2015-12-06T22:58:34+5:302015-12-07T00:30:37+5:30

साताऱ्यातील पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन

'NCP activists' on cycle | ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते चक्क सायकलवर..

‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते चक्क सायकलवर..

Next

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सातारा शहरातून रविवारी सकाळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ‘कृतज्ञता सायकल रॅली’ आयोजित केली होती. या रॅलीत शेकडो तरुण सहभागी झाले होते.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सातारा शहरासह जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा परिषदेतर्फे आरोग्य शिबिरे घेण्याचे नियोजन केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सायकल रॅली काढण्याचे नियोजन केले होते. रॅलीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. साताऱ्यातील पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून, सातारा पालिकेसमोरील आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. ही रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून गोलबाग मार्गे शेटे चौक मार्गे राष्ट्रवादी भवनजवळ आली असता रॅलीची सांगता झाली. यावेळी ‘युवक’चे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, दीपक दीक्षित, महेश जाधव, महेश जाधव, ज्योतिराम पवार, सागर जगताप यांच्यासह पदाधिकारीउपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: 'NCP activists' on cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.