अनामत रकमेअभावी राष्ट्रवादीचा अर्ज अवैध

By admin | Published: February 7, 2017 11:07 PM2017-02-07T23:07:17+5:302017-02-07T23:07:17+5:30

कऱ्हाड तालुका : जिल्हा परिषद गटासाठी १५१ तर पंचायत समिती गणासाठी २८४ उमेदवारांचे अर्ज वैध

NCP's application is invalid due to non-payment of funds | अनामत रकमेअभावी राष्ट्रवादीचा अर्ज अवैध

अनामत रकमेअभावी राष्ट्रवादीचा अर्ज अवैध

Next



कऱ्हाड : जिल्हा परिषदेसाठी कऱ्हाड तालुक्यातील पाल, उंब्रज, मसूर, कोपर्डे हवेली, तांबवे, सैदापूर, वारुंजी, विंग, कार्वे, रेठरे बुद्रुक, काले, येळगाव या बारा गटांतून १५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर पंचायत समितीच्या चोवीस गणांतून २८५ अर्ज दाखल झाले होते. त्याची अर्ज छाननी मंगळवारी झाली. राष्ट्रवादी काँगे्रसमधून कार्वे
गणातून रूपाली मारुती मुळे यांनी दाखल केलेला अर्ज अनामत रक्कम न भरल्याने तसेच जात प्रमाणपत्र व जातपडताळणी सादर न केल्यामुळे यांचा निवडणूक निर्णय
अधिकारी किशोर पवार यांनी अवैध ठरविला.
येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्रामध्ये मंगळवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी किशोर पवार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्जांची छाननी केली. यावेळी उमेदवारांनी उपस्थिती लावली होती.
दरम्यान, मंगळवारी करण्यात आलेल्या छाननीत पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँगे्रसच्या एबी फॉर्मच्या साह्याने दाखल केलेल्या कार्वे गणातील उमेदवार रूपाली मारुती मुळे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी झालेल्या अर्ज छाननीत अवैध ठरवला.
अर्ज छाननी सुरू असलेल्या बहुउद्देशीय केंद्र परिसरात सकाळपासून उमेदवारांनी गर्दी केली होती. सोमवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. त्यांनतर लगेच चिन्हवाटप केले जाणार आहे. तर मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्षपणे मतदान घेण्यात येणार आहे. तालुक्यातील बारा गट व चोवीस गणांचा निकाल गुरुवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतमोजणीनंतर जाहीर केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
शिवसेना पक्षातर्फे गटासाठी ६ तर गणासाठी ६ उमेदवार
जिल्हा परिषद गट व उमेदवार :- वारुंजी- कोमल लोहार, विंग- दिलीप यादव, काले-सुनील शिंंदे, येळगाव- कृष्णत म्हारूगडे, सैदापूर- किरणकुमार खवळे, तांबवे - सचिन महाडिक व हणमंत सुर्वे, मसूर- सतीश पाटील
पंचायत समिती गण व उमेदवार :- पाल- सुरेश कळंबेकर, चरेगाव- वर्षा माने व प्रभावती संकपाळ, उंब्रज- जयश्री माने व रोहिणी आहिरे, तळबीड- बापूराव भिसे व संजय कमाणे, वडोली भिकेश्वर- शंकर पाटील, मसूर- प्रियांका उमरदंड व अर्चना खोत, हजारमाची - महेंद्र पाटील.२२

Web Title: NCP's application is invalid due to non-payment of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.