साताऱ्यात DCC मध्ये ओबीसी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदीप विधाते विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 10:21 AM2021-11-23T10:21:17+5:302021-11-23T10:22:14+5:30

प्रदीप विधाते या मतदारसंघात निवडून येतील याविषयी कोणाच्या मनात शंका नव्हती. मात्र, या मतदारसंघात काहीतरी भलत-सलत सुद्धा घडू शकते, अशी भीती राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली होती.

NCP's Pradip Vidhate wins from OBC constituency in Satara DCC Bank | साताऱ्यात DCC मध्ये ओबीसी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदीप विधाते विजयी

साताऱ्यात DCC मध्ये ओबीसी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदीप विधाते विजयी

googlenewsNext

सातारा - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत या वर्षी राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनेलकडून इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांच्या विरोधात शेखर गोरे यांनी उमेदवारी दाखल केली. अखेर, निवडणूक निकाल हाती आला असून प्रदीप विधाते यांनी या मतदारसंघातून शेखर गोरे यांचा पराभव केला आहे. 

प्रदीप विधाते या मतदारसंघात निवडून येतील याविषयी कोणाच्या मनात शंका नव्हती. मात्र, या मतदारसंघात काहीतरी भलत-सलत सुद्धा घडू शकते, अशी भीती राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. परिणामी प्रदीप विधाते यांनी या मतदारसंघावर बारकाईने नजर ठेवली होती. विरोधी उमेदवारावर ही त्यांची नजर होती. त्यांना एकूण 1459 इतकी मते मिळाली असून प्रतिस्पर्धी उमेदवार शेखर गोरे यांचा त्यांनी 1080 इतक्या मतांनी पराभव केला आहे या निवडणुकीत गोरे यांना 359 इतकी मते मिळाली आहेत.

एकूण मते -       1964       
झालेली मते -      1892

वैध मते -         1838            
अवैध मते -        54       


उमेदवार            मिळालेली मते
शेखर गोरे          379
प्रदीप विधाते        1459

विजयी उमेदवार - प्रदीप विधाते
मतांचे लीड - 1080

Web Title: NCP's Pradip Vidhate wins from OBC constituency in Satara DCC Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.