कोयनेतील पाणीसाठा ४२ टीएमसीजवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:59+5:302021-06-26T04:26:59+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरूपात पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघे २९ मिलीमीटर पर्जन्यमान ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरूपात पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघे २९ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयना धरणातील पाणीसाठा ४१.८६ टीएमसी झाला होता. त्याचबरोबर सातारा शहर व परिसरात ढगाळ वातावरण कायम होते.
जिल्ह्यात मागील आठवड्यात पश्चिम भागात धुवाँधार पाऊस झाला होता. त्यानंतर शनिवारपासून पावसाचा जोर कमी झाला. सध्या तुरळक स्वरूपात पाऊस होत आहे. तसेच कोयनासह प्रमुख धरण परिसरातही पावसाची अत्यल्प हजेरी आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात २९, तर या वर्षी जूनपासून ८७४ मिलीमीटर पाऊस झाला. नवजाला ३३ तर यावर्षी आतापर्यंत ९८४ आणि महाबळेश्वर येथे सकाळपर्यंत २४ व जूनपासून ११४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात अधिक पाऊस महाबळेश्वरला पडला आहे.
दरम्यान, कोयना धरणात ४१.८६ टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर ७८०० क्सुसेक पाण्याची आवक होत होती. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मागील आठ दिवसांपासून हा विसर्ग सुरू आहे.
.........................................................