शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची गरज

By admin | Published: March 25, 2016 10:22 PM2016-03-25T22:22:45+5:302016-03-25T23:32:17+5:30

शिवेंद्रसिंहराजे भोसले : राज्यस्तरीय अजिंंक्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

Need of Advanced Technology in Agriculture | शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची गरज

शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची गरज

Next

सातारा : ‘आजच्या स्पर्धेच्या युगात शेती व्यवसायात आमुलाग्र बदल होत आहेत. पारंपरिक शेती चालत नाही, हे शेतकऱ्यांना उमगले आहे. कमी खर्चात आणि कमी क्षेत्रात जास्तीत-जास्त उत्पादन मिळाले तरच शेती व्यवसाय फायदेशीर ठरणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, खते, बी-बियाणे, अवजारे यांचा वापर शेती व्यवसायात करणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी केले.
येथील जिल्हा परिषद मैदानावर बाजार समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अजिंंक्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सतीश चव्हाण, सदस्य राजू भोसले, किरण साबळे-पाटील, जितेंद्र सावंत, पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, सदस्य आनंदराव कणसे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सुनिल काटकर, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष जयवंत भोसले, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे, बाजार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. विक्रम पवार, उपाध्यक्ष बाबासाहेब घोरपडे
आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले म्हणाले, ‘आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सातारा बाजार समितीने नावीन्यपूर्ण असे कृषीप्रदर्शन भरवले आहे. शुअर शॉटचे संदीप गिड्डे यांनी नेटके संयोजन केल्याने प्रदर्शनाला शिस्तबद्धता आल्याचे दिसत
आहे.
शेती व्यवसायाच्या वृद्धीसाठी, शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत-जास्त उत्पन्न कसे मिळेल, याची माहिती उपलब्ध होण्यासाठी अशा प्रदर्शनांची नितांत आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी ठिबक सिंचन चालत नाही, अशी परिस्थिती होती. ती परिस्थिती आमुलाग्र बदलामुळे बदलली असून, आता ठिबक फायद्याचे ठरत आहे. पाण्यासह खर्चात आणि वेळेत बचत होत आहे. अशा प्रदर्शनाला भेटी देऊन शेतकऱ्यांनी शेतीतील नवीन तंत्रज्ञान, योजना, मशागतीची नवीन साधने, उपकरणे आदींची माहिती घेऊन त्याचा वापर करावा.’
यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार शिवेंदसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शुअर शॉटचे संदीप गिड्डे, शिक्षण सभापती चव्हाण, अ‍ॅड. लालासाहेब पवार यांचा सत्कार करण्यात
आला.
मान्यवरांच्या हस्ते जपान कुबोटा तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक पॉवर टिलरचे लॉचिंंग करण्यात आले. सुजित शेख यांनी सूत्रसंचालन केले. काका धुमाळ यांनी आभार
मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Need of Advanced Technology in Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.