संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी विवेकवाहिनीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:35+5:302021-02-23T04:57:35+5:30
पाचवड : ‘बुद्धी ही मानवाला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. त्यामुळे मानवाने विवेकशीलतेला जागृत ठेवून समाजामध्ये आचरण केले पाहिजे. म्हणजे ...
पाचवड : ‘बुद्धी ही मानवाला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. त्यामुळे मानवाने विवेकशीलतेला जागृत ठेवून समाजामध्ये आचरण केले पाहिजे. म्हणजे समाजामध्ये अंधश्रद्धा, महिला असुरक्षितता, बलात्कार अशा घटनांना आळा बसू शकेल आणि व्यक्ती योग्य दिशेने वाटचाल करेल. विवेकवाहिनीच्या माध्यमातून आजच्या तरुणांमध्ये प्रबोधन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विवेकवाहिनी व प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने ‘विवेकवाहिनी कशासाठी व कशाप्रकारे’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनार झाले. यावेळी ते बोलत होते.
या सेमिनारचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप शिंदे यांनी विवेकवाहिनीच्या माध्यमातून सर्वांगीण ज्ञानवंत, गुणवंत विद्यार्थी तयार होतात आणि देशाच्या उभारणीसाठी योगदान देतात. अशी संस्कारशील पिढी घडण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात विवेकवाहिनी कार्यरत असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. अनेक विविध कार्यक्रम घेण्याविषयीच्या संकल्पना राबविण्यात त्यांची सतत धडपड असते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकवाहिनी आणि प्राध्यापक प्रबोधिनी कमिटीच्या समन्वयक प्रा. राणी शिंदे यांनी अगदी ओघवत्या भाषेत केले. या सेमिनारसाठी माहिती-तंत्रज्ञानाचे साहाय्य ग्रंथपाल डॉ. अमोल खोब्रागडे व डॉ. प्रणाली गेडाम यांचे विशेष सहकार्य लाभले. या सेमिनारमध्ये एकूण २६२ व्यक्तींनी नावनोंदणी केली. यामध्ये मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या कार्यक्रमाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापिका राजश्री गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. शरद पवार यांनी आभार मानले.
फोटो आहे..