फलकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:35 AM2021-01-22T04:35:49+5:302021-01-22T04:35:49+5:30

सिग्नल झुडुपात (फोटो : २१इन्फोबॉक्स०१) कऱ्हाड : शहरात वाहतूक नियंत्रणासाठी मुख्य चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, ...

The need for panels | फलकांची गरज

फलकांची गरज

Next

सिग्नल झुडुपात (फोटो : २१इन्फोबॉक्स०१)

कऱ्हाड : शहरात वाहतूक नियंत्रणासाठी मुख्य चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे या यंत्रणेचा बोजवारा उडत आहे. उपजिल्हा रुग्णालय तसेच कर्मवीर चौकात सिग्नलसमोरच झाडे-झुडुपे असल्यामुळे चालकांना सिग्नल दृष्टीस पडत नाही. पोपटभाई पेट्रोल पंप चौकातील सिग्नल यंत्रणेत नेहमीच बिघाड होत असतो.

रस्ता खड्ड्यात

कोपर्डे हवेली : बनवडी फाट्यापासून कोपर्डे हवेलीपर्यंत क-हाड-मसूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सिंदल ओढ्यानजीक तर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्डे मुजविण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.

उपमार्गावर अंधार

कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्त्यांवर विजेची व्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य पाहावयास मिळते. उपमार्गावरून रात्री सायकलने प्रवास करणे अथवा पायी चालत जाणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावर दिव्यांची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

Web Title: The need for panels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.