पश्चिम घाटातील पडीक जमिनीवर वृक्ष लागवडीची गरज : पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:30 AM2021-05-30T04:30:21+5:302021-05-30T04:30:21+5:30

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, ग्लोबल वाॅर्मिंग, आदी बाबींचा विचार करता आयुष्यात वन मोठे की धन ...

Need for tree planting on waste land in Western Ghats: Patankar | पश्चिम घाटातील पडीक जमिनीवर वृक्ष लागवडीची गरज : पाटणकर

पश्चिम घाटातील पडीक जमिनीवर वृक्ष लागवडीची गरज : पाटणकर

Next

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, ग्लोबल वाॅर्मिंग, आदी बाबींचा विचार करता आयुष्यात वन मोठे की धन मोठे याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. पैसा आणि संपत्ती ऑक्सिजन विकत घेऊ शकत नाही. निसर्गामधून फुकट मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत आपणाला कधी कळणार म्हणून भविष्यात जगण्यासाठी धनापेक्षा वनसंपत्ती महत्त्वाची आहे.’

आता शंभर कोटी झाडे लावण्याचे फसवे कार्यक्रम थांबवू या आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहत असलेल्या आणि निसर्गाचे संगोपन करणाऱ्या पश्चिम घाटातील गरीब इमानदार शेतकऱ्यांना झाडे लावून जगविण्याची जबाबदारी देऊया. ते या वृक्षांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतील. महाराष्ट्रतील पश्चिम घाटातील कोट्यवधी पडीक जमिनीवर औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, मसाल्याच्या वनस्पती लावून त्यांचे संगोपन केले तर आयुष्यभर स्थानिकांना उत्त्पन्न मिळेल. डोंगरावर वृक्षारोपण करण्यासाठी लागणारी पाण्याची गरज ही डोंगरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करण्यासाठी मोठ्या साईट आहेत त्या ठिकाणी शेततळी काढून त्यामध्ये साठवण केली तर वृक्षारोपणासाठी ग्रॅव्हिटीने झाडांना विना इंधन पाणी मिळेल. डोंगर उतारावर पडीक जमिनीवर नैसर्गिक पाण्यावर झाडे लावून ग्रीन कव्हर वाढवता येईल. शासनाच्या वतीने झाडे लावण्याच्या योजना पुष्कळ आहेत; पण त्या दुर्गम भागात असलेल्या प्रत्येक गावात पोहोचण्यासाठी यंत्रणा अपुरी पडत आहेत. ही पश्चिम घाटातील दुर्गम डोंगराळ भागात पोहोचविण्यासाठी समाजसेवा संस्था पुढे आल्या पाहिजेत. त्याच्या माध्यमातून अर्धशिक्षित डोंगराळ भागातील शेतकऱ्यांपर्यंत या वृक्षारोपणच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, असे मत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले.

Web Title: Need for tree planting on waste land in Western Ghats: Patankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.