नीरा उजव्या कालव्याला वेड्या बाभळीचा विळखा, शेतकऱ्यांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 04:13 PM2019-06-17T16:13:16+5:302019-06-17T16:14:41+5:30

विडणी, ता. फलटण येथील नीरा उजवा कालवा सध्या वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्या कालव्याला वेड्या बाभळीच्या झाडांनी विळखा घातला आहे. यामुळे कालव्याला भगदाड पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Neera Right canal cracked in a dark place, fear of farmers | नीरा उजव्या कालव्याला वेड्या बाभळीचा विळखा, शेतकऱ्यांमध्ये भीती

नीरा उजव्या कालव्याला वेड्या बाभळीचा विळखा, शेतकऱ्यांमध्ये भीती

googlenewsNext
ठळक मुद्देनीरा उजव्या कालव्याला वेड्या बाभळीचा विळखाशेतकऱ्यांमध्ये भीती : भरावाच्या भिंती जीर्ण; भगदाड पडण्याची शक्यता

वाठार निंबाळकर : विडणी, ता. फलटण येथील नीरा उजवा कालवा सध्या वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्या कालव्याला वेड्या बाभळीच्या झाडांनी विळखा घातला आहे. यामुळे कालव्याला भगदाड पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

वीर धरणामधून खंडाळा, फलटण, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांतील शेती पाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नीरा उजव्या कालव्याला फलटण तालुक्याच्या हद्दीत कालव्याच्या आतील व बाहेरील बाजूस मोठ्या प्रमाणात वेड्या बाभळी उगविल्या आहेत.

या बाभळीच्या मुळ्या अस्ताव्यस्तपणे भरावामध्ये पसरल्याने अनेक ठिकाणी कालवा पाझरून पाणी वाया जात आहे. तसेच भरावाच्या भिंती जीर्ण होऊन जागोजागी खचून भरावाची रुंदी अनेक ठिकाणी तीन ते चार फूट इतकी झाली आहे.

Web Title: Neera Right canal cracked in a dark place, fear of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.