अपघातात नेपाळच्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:37 AM2019-04-18T11:37:35+5:302019-04-18T11:39:14+5:30
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काशीळ, ता. सातारा येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत
अपघातात नेपाळच्या युवकाचा मृत्यू
सातारा : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काशीळ, ता. सातारा येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नरेश खडकसिंग बोहरा (वय २७, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. काशीळ) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी सहा वाजता झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नरेश बोहरा हा गेल्या काही वर्षांपासून काशीळ येथील एका ढाब्यावर वेटरचे काम करत होता. बुधवारी सायंकाळी काही कामानिमित्त तो दुचाकीवरून जात असताना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नरेश हा दूरवर फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखम झाली. रुग्णवाहिकेतून त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
अपघातात मृत्यू झालेल्या युवकावर गुन्हा
सातारा : टॅक्टरखाली सापडून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक फिरोज रज्जाक पठाण (वय ३२, रा. अंतरवल्ली ता. भुम जि. उस्मानाबाद) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील शिवराज पेट्रोल पंपासमोर २५ मार्च रोजी फिरोज पठाण हा उसाने भरलेला टॅÑक्टर घेऊन निघाला होता. यावेळी चढावर टॅÑक्टर चढत नव्हता. त्यामुळे टॅÑक्टरवरून खाली उतरून पठाण हा ट्रॉलीला ऊटी लावण्याचा प्रयत्न करत होता. याचवेळी अचानक टॅÑक्टर ट्रॉलीच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली तो सापडला. महामार्गावर घासत पुढे गेल्याने तो गंभीर जखमी झाला. यातच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर फिरोज पठाण याचा स्वत:च्या मृत्यूस हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष पोलिसांना काढला. त्यानंतर त्याच्यावर मोटार वाहन कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.