पार्लेत लसीकरणाचे नेटके नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:38 AM2021-05-26T04:38:26+5:302021-05-26T04:38:26+5:30

पार्ले येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. ...

Net planning of vaccination in Parle | पार्लेत लसीकरणाचे नेटके नियोजन

पार्लेत लसीकरणाचे नेटके नियोजन

Next

पार्ले येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी उपसरपंच मोहन पवार, अविनाश नलवडे, भाऊसाहेब घाडगे, अजित पाटील, विनायक माळी, डॉ. घाडगे उपस्थित होते.

सागर शिवदास म्हणाले, लसीकरणादरम्यान बनवडी, सैदापूर, पार्ले येथील लसीकरणासाठी आलेल्या लोकांचे लसीकरण व्हावे, यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात लस पुरवठा व्हायला हवा यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे लोकसंख्येच्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

लसीकरणाबाबत माहिती घेत लसीकरणासाठी बाहेर गावाहून येणारे लोक आणि लसीचा होणारा पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात वाद होत असल्याबद्दल निवास थोरात यांनी खेद व्यक्त केला. गावनिहाय लसीकरण झाले पाहिजे यासाठी आमची आग्रही भूमिका असून त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे थोरात यांनी सांगितले.

Web Title: Net planning of vaccination in Parle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.