वडूथ, पुसेगाव, क्षेत्र माहुली व अंगापूर येथे नवीन कोविड सेंटर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:39 AM2021-04-17T04:39:20+5:302021-04-17T04:39:20+5:30

कोरेगाव : ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील वडूथ, पुसेगाव, क्षेत्र माहुली आणि अंगापूर वंदन या ठिकाणी कोविड सेंटर उभारणीस शुक्रवारी ...

New Covid Centers at Vaduth, Pusegaon, Kshetra Mahuli and Angapur | वडूथ, पुसेगाव, क्षेत्र माहुली व अंगापूर येथे नवीन कोविड सेंटर्स

वडूथ, पुसेगाव, क्षेत्र माहुली व अंगापूर येथे नवीन कोविड सेंटर्स

Next

कोरेगाव : ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील वडूथ, पुसेगाव, क्षेत्र माहुली आणि अंगापूर वंदन या ठिकाणी कोविड सेंटर उभारणीस शुक्रवारी झालेल्या विशेष बैठकीत मान्यता देण्यात आली. या सेंटर्ससाठी आवश्यक साहित्य व सुविधा तयार तत्काळ केल्या जाणार आहेत,’ अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत निर्णय झाला. या सर्व सेंटरला पूर्वीची मान्यता घेतली होती. या कोविड सेंटरसाठी दहा लाख रुपये आमदार निधीतून दिले आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त ५० लाख रुपये निधी मंजूर व्हावा, यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतले आहेत.

येत्या सात दिवसांत प्रत्येकी ३० बेड्सचे हे कोविड सेंटर सुरू करण्यात येईल. कोविड सेंटरमध्ये लागणार असलेल्या इतर आरोग्य सुविधा, औषधे, यंत्रणा उभी करण्यात आमदार म्हणून मी कोठेही कमी पडणार नाही व सातारा जम्बो कोविड हॉस्पिटलप्रमाणे येथेही सर्व सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती आमदार शिंदे यांनी दिली.

बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी समितीचे सभापती मंगेश धुमाळ, सतीश चव्हाण, खटाव पंचायत समितीचे सदस्य संतोष साळुंखे आदी उपस्थित होते.

चौकट :

सरकारच्या नियमांचे पालन करा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सातारा तसेच नवी मुंबई येथे रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देणे, रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून देणे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण त्याला आता मर्यादा येऊ लागल्या आहेत, या सर्व यंत्रणा कमी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे.

Web Title: New Covid Centers at Vaduth, Pusegaon, Kshetra Mahuli and Angapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.