ढासळलेल्या दुभाजकास नवीन स्वरूप !
By Admin | Published: June 4, 2017 10:44 PM2017-06-04T22:44:48+5:302017-06-04T22:44:48+5:30
ढासळलेल्या दुभाजकास नवीन स्वरूप !
ढासळलेल्या दुभाजकास नवीन स्वरूप !
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : दत्तचौक ते बसस्थानक मार्गावर अठरा दिवसांपूर्वी बसविण्यात आलेल्या दुभाजकांतील काही भाग कोसळल्यानंतर संबंधित कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी ढासळेलेल्या व बांधकाम करण्यात येत असलेल्या दुभाजकाची पाहणी केली. व दर्जात्मक पद्धतीने काम करण्याच्या ठेकेदारास सुचना दिल्या. त्यानंतर अठरा दिवसानंतर संबंधित ठेकेदाराकडून ढासळलेल्या दुभाजकाचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय दुभाजकास आकर्षक रंगरंगोटीही करण्यात येणार आहे.
शहरातील दत्तचौक ते बसस्थानक परिसरात महिनाभरापूर्वी नविन दुभाजक बसविण्याच्या कामस प्रारंभ करणण्यात आला. काम सुरू असताना कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील दुभाजकाचा काही भाग अचानक ढासळला. त्यामध्ये दुभाजकातील सिमेंटचे तुकडे खाली पडल्याने तुटले. अगदी कमी अंतरावरून दुभाजकाचे तुकडे खाली पडल्याने ते तुटल्यामुळे दुभाजक बांधकाम वापरण्यात येणाऱ्या सिमेंट व लोखंडी सळ्यांचा दर्जा काय असेल या बाबत अनेक प्रश्न निर्माण झाला होता.
याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत नगराध्यक्षांसह पालिकेतील कर्मचाऱ्यांनी ढासळलेल्या दुभाजकाची पाहणी करीत ठेकेदारास सुचना केल्या. नगराध्यक्षांच्या सुचनेनंतर व वृत्त प्रसिद्धीनंतर ठेकेदाराने तब्बल चौदा दिवसांनी ढासळलेल्या दुभाजकाच्या जागी नव्याने दुभाजक बसविले आहेत. तसेच लवकरच आकर्षक रंगरंगोटी करण्यात येणार आहे. ढासळलेल्या दुभाजकाच्या जागी नव्याने दुभाजक बसविण्यात आलेल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरातील दत्तचौक ते बसस्थानक परिसरात नविन दुभाजक बसविण्याचे काम सध्या पूर्ण झाले आहे. दुभाजक बांधकामाच्यावेळी त्यांमध्ये सुरूवातीला मुरूम टाकण्यात आला होता. नगराध्यक्षांनी पाहणी दरम्यान सुचना केल्यानंतर मुरूम काढून त्यामध्ये गाळमिश्रीत माती टाकण्यात आली आहे. सध्या दत्तचौक ते बसस्थानक रस्त्यावरील दुभाजकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. त्याची आकर्षक रंगरंगोटीही केली आहे. मात्र, त्यामध्ये शोभीवंत फुलझाडे अद्यापही बसविण्यात आलेली नाहीत. फुलझाडे बसविण्यात आल्यानंतर दुभाजकास आकर्षक रूप प्राप्त होईल हे नक्की !
शहरातील शहरात कोल्हापूर नाका ते पोपटभाई पेट्रोलपंप चौक, पोपटभाई पेट्रोलपंप चौक ते मोहिते हॉस्पीटल मार्गे भेदा चौक, भेदा चौक ते संभाजी भाजी मार्केट मार्गे पंचायत समिती चौक अशा ठिकाणी ठेकेदाराकडून दुभाजकाचे बांधकाम तसेच त्यास आकर्षक रंगकाम करण्यात आलेले आहे. दुभाजकाच्या दुरूस्तीमुळे नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.
अपघावर नियंत्रण आणि सौदर्यात भरही
शहरात दुचाकी व चारचाकी वाहनधारकांमधील काहीजण मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने चालवित असतात. त्यांच्यामध्ये वाहनांना वाहने धडकून अपघातही होतात. तर काही वाहने दुभाजकाला धडकून खाली पडतात. यात दुभाजकासह वाहनचालविणाऱ्याचे व वाहनाचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी दुकाचीच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचे दुभाजक सध्या शहरातील मुख्य मार्गावर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अपघातावर नियंत्रणही येणार आहे.
दुभाजक झाले आता प्रतिक्षा वृक्षारोपणाची
शहरातील मुख्य मार्गावर नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या दुभाजकाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र, त्यामध्ये नवीन शोभीवंत फुलझाडे कधी बसविण्यात येणार याची प्रतिक्षा शहरवासियांना लागून राहिली आहेत. महामार्गाच्या मधोमध बांधण्यात आलेल्या दुभाजकात ज्याप्रमाणे फुलझाडे लावण्यात आली आहेत. त्याप्रमाणे छोटी छोटी फुलझाडे छोट्या दुभाजकात लावण्यात आल्यास शहरातील सौंदर्यात चांगल्या प्रकारे भरच पडणार हे नक्की !
मुरूमाचा काढून मातीचा टाकला भराव
शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते बसस्थानक परिसरात करण्यात येत असलेल्या दुभाजक बांधकामात मुरूममिश्रीत माती टाकली जात असल्याचे दिसून आल्यानंतर नगराध्यक्षा शिंदे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. व दुभाजकात फुलझाडे लावण्यात येणार असल्याने त्यामध्ये माती टाकून ते भरून घ्यावेत अशा सुचना शिंदे यांनी ठेकेदारास केल्या असता ठेकेदाराकडून मुरूम काढून त्यामध्ये माती टाकण्यात आली आहे.