नवीन पदाधिकाऱ्यांमुळे काँग्रेस भरारी घेईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:44 AM2021-08-20T04:44:43+5:302021-08-20T04:44:43+5:30

वडूज : ‘खटाव, माण तालुका सुरुवातीपासूनच काँग्रेस विचाराचा राहिला आहे. काही वर्षांत काही अपप्रवृत्तींच्या लालसेपोटी घडी विस्कटली होती. आता ...

With the new office bearers, the Congress will take over | नवीन पदाधिकाऱ्यांमुळे काँग्रेस भरारी घेईल

नवीन पदाधिकाऱ्यांमुळे काँग्रेस भरारी घेईल

Next

वडूज : ‘खटाव, माण तालुका सुरुवातीपासूनच काँग्रेस विचाराचा राहिला आहे. काही वर्षांत काही अपप्रवृत्तींच्या लालसेपोटी घडी विस्कटली होती. आता प्रदेश पातळीवरील प्रदेश संघटनेकडून मिळणारी ताकद जुन्या-नवीन कार्यकर्त्यांचा मेळ घालून झालेल्या नूतन पदाधिकारी निवडी संघटनेला बळकटी मिळेल. त्यातून अल्पावधीतच पक्ष भरारी घेईल,’ असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.

येथील फिनिक्स ऑगनायझेशन सभागृहात जिल्हा नियोजन सदस्यपदी अशोकराव गोडसे यांची नियुक्ती झाल्याच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष महेश गुरव, जिल्हा सरचिटणीस भरत जाधव, बहुजन क्रांतिदलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, डॉ. संतोष गोडसे उपस्थित होत.

देशमुख म्हणाले, ‘जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार नसताना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषविताना जिल्हा परिषदेमध्ये सत्तावीस सदस्य होते. यापुढील काळात निष्ठांवत कार्यकर्त्याला पक्ष ताकद देणार आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी उर्वरित काळात पक्षवाढीसाठी वेळ द्यावा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पक्षपातळीवर लढविल्या जातील. पक्षासोबत प्रामाणिक राहणाऱ्यांचा योग्य वेळी सन्मान होईल. यापुढे येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना वगळून पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत घेणार आहे.’

अशोकराव गोडसे म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष हा त्यागातून घडलेला आहे. स्वातंत्र्यापूर्वीपासून काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य घटकांबरोबर घेऊन समाजकारण व राजकारण केलेले आहे. चाळीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे समाजोपयोगी भरपूर कामे करता आली. नवीन पदामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे. तळागळातील घटकांपर्यंत पोहोचण्याची संधी पुन्हा एकदा पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली आहे.’

यावेळी सत्यवान कमाने, महेश गुरव, भरत जाधव, अंभेरीचे सरपंच सोमनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच अर्जुन गोडसे, माजी सरपंच प्रतापराव काटकर, परेश जाधव, माजी प्राचार्य दिलीपराव डोईफोडे, प्रल्हाद सावंत, डॉ. बाळासाहेब झेंडे, संतोष मांडवे, डॉ. महेश माने, राहुल सजगणे, आनंदा साठे, दाऊद मुल्ला उपस्थित होते. प्रा. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र माने यांनी आभार मानले.

फोटो

वडूज येथील जिल्हा नियोजन समितीतील नूतन सदस्य अशोकराव गोडसे यांचा सत्कार रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेजारी सत्यवान कमाने, महेश गुरव, डॉ. संतोष गोडसे उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव )

Web Title: With the new office bearers, the Congress will take over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.