नवख्यांची कसरत अन् जुन्यांचे फिक्सिंग!
By admin | Published: July 6, 2016 11:42 PM2016-07-06T23:42:10+5:302016-07-07T00:49:38+5:30
प्रभाग रचना : सातारा पालिकेत जुनेच चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता--सातारा पालिकेतून
सातारा : सातारा पालिका निवडणुकीसाठी नुकतीच शहराची प्रभाग रचना व आरक्षण सोडती जाहीर झाल्या. या प्रभाग रचनेमुळे आगामी निवडणुकीत जुन्यांचे फिक्सिंग आणि नवख्यांची कसरत पाहायला मिळणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते.
प्रभाग रचनेमध्ये प्रस्थापित बहुतांश नगरसेवकांचे आसन ‘सेफ’ राहिले आहे. जुन्या नगरसेवकांपैकी काहींना आरक्षणामुळे दुसऱ्या ठिकाणी नशीब आजमावयला लागणार आहे. मात्र, त्या ठिकाणच्या प्रस्थापित उमेदवाराचा त्याला कडाडून विरोध होण्याची शक्यता असल्याने आगामी निवडणुकीत काट्याची टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच विद्यमान नगरसेवकांचे सध्याचे प्रभाग विभागले असल्याने त्यांना निवडणुकीत एकमेकांची मदत घ्यावी लागणार आहे.
प्रारूप प्रभाग रचनेतील प्रमुख ठिकाणे अशी आहेत :
प्रभाग १ : भोसले मळा, धंदे शिक्षण शाळा, बी ग्राउंड पोलिस वसाहत, तहसील कार्यालय, रविवार पेठ भाजी मंडई
प्रभाग २ : रिमांड होम, कांगा कॉलनी, बेगर्स होम, जवान सोसायटी, जुने नगरपालिका कार्यालय
प्रभाग ३ : लक्ष्मी टेकडी, पारशी अगॅरी, सुमित्राराजे वाचनालय
प्रभाग ४ : सैनिक स्कूल, भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, कूपर बंगला, कुबेर गणेश मंदिर, विश्रामगृह. प्रभाग ५ : सातारा पंचायत समिती, पोस्ट आॅफिस, कामाठीपुरा, गोडोली, डीसीसी बँक. प्रभाग ६ : जिल्हा शासकीय रुग्णालय, नगरपालिका मुख्य कार्यालय, अजिंक्य कॉलनी, सेंट पॉल स्कूल, शिवाजी सर्कल, यशवंत गार्डन, पोलिस करमणूक केंद्र, तोफखाना
प्रभाग ७ : पंताचा गोट, पोलिस मुख्यालय, मल्हार पेठ, विठ्ठल मंदिर
पालिका बातमीसोबत
प्रभाग ८ : तेली खड्डा, साखरे तळे, बुधवार तालीम, बारटक्के चौक, बुधवार नाका. प्रभाग ९ : प्रतापसिंह शेती फार्म, बसाप्पा पेठ, रघुनाथपुरा पेठ, भैरवनाथ मंदिर, होळीचा टेक. प्रभाग १० : एकता कॉलनी, अर्कशाळा नगर, अभयसिंहराजे स्मृती उद्यान, कोटेश्वर मैदान.
प्रभाग ११ : जुना मोटार स्टॅण्ड, महात्मा फुले भाजी मंडई, प्रतापसिंह उद्यान, सुरूची बंगला, जलमंदिर, बदामी पार्क, अर्कशाळा. प्रभाग १२ : तालीम संघ, एलबीएस कॉलेज, गुरुवार परज, खणआळी. प्रभाग १३ : मोमीन दुकान ते झारी बोळ, भवानी पेठ, गुरुवार पेठ. प्रभाग १४ : शिर्के शाळा, शकुनी गणपती मंदिर, शाहू उद्यान, कूपर कारखाना, पिसाळ आर्केड, केसरकर पेठ.
प्रभाग १५ : शंकराचार्य मठ, अदालतवाडा, समर्थ मंदिर, रेणुका मंदिर. प्रभाग १६ : हत्तीखाना, राजधानी टॉवर, गोल मारुती मंदिर, मंत्री बोळ. प्रभाग १७ : राजवाडा, मोती तळे, शाहू कलामंदिर, मंगळवार तळे, अनंत इंग्लिश स्कूल, नागाचा पार. प्रभाग १८ : धननीची बाग, कृष्णेश्वर मंदिर, बहुलेश्वर मंदिर, गारेचा गणपती, कारंडबी नाका.
प्रभाग १९ : पोळ वस्ती, पापाभाई पत्रेवाला, ढोणे कॉलनी, संत कबीर सोसायटी, नगरपालिका कामगार वसाहत, बोगदा परिसर, मंगळवार समाजमंदिर. प्रभाग २० : स्टेट बँक कॉलनी, गुरुकुल कॉलनी, खडकेश्वर मंदिर, कला व वाणिज्य महाविद्यालय, खारी विहीर, महाराष्ट्र क्रीडा मंडळ. या प्रभाग रचनेचा बहुतांश प्रस्थापितांना लाभ होणार असला तरी नवख्या उमेदवारांसाठी निवडणूक सोपी राहिलेली नाही, हे मात्र खरे!