पुढील महाराष्ट्र केसरीचा किताब साताऱ्यालाच... सूळ घराण्याने दिले दोन उपमहाराष्ट्र केसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:45 AM2020-01-12T00:45:22+5:302020-01-12T00:47:10+5:30
सूळ घराण्याने जिल्ह्णाला दोन उपमहाराष्ट्र केसरीचे किताब मिळवून दिले. पुढील वर्षी महाराष्ट्र केसरीसाठी खेळणार आहे. त्यामुळे जिल्ह्णाला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवून देणारच. - विकास सूळ, सुवर्णपदक विजेता, महाराष्ट्र केसरी स्पर्र्धा
योगेश घोडके।
सातारा : सातारा जिल्हा हा राजकीय, क्रीडा आणि सामाजिक कारणांनी चर्चेत राहिला आहे. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात कबड्डी, मल्लखांब, धावणे आणि कुस्ती या खेळांनी देशपातळीवर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. कुस्तीमध्ये खाशाबा जाधव यांनी आॅलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. त्यामुळे साताºयाचे कुस्ती क्षेत्रामध्ये आजही दबदबा आहे. खडकी, ता. फलटण येथील महाराष्ट्र केसरीत सुवर्णपदक विजेता पैलवान विकास सूळ याच्याशी साधलेला सवांद..
प्रश्न : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले, पुढे काय?
उत्तर : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ९७ वजन गटात सुवर्णपदक पटकाविले. पुढील वर्षी होणाºया महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे दारे माझ्यासाठी सोपी झाली आहेत. त्यामुळे पुढीलवर्षी संधी मिळणार आहे.
प्रश्न : सुवर्णपदक मिळविण्यासाठी योगदान म्हणावे लागेल?
उत्तर : सध्या पंजाब येथील धुमछडी वस्ताद तालमीमध्ये सराव करत आहे. सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रशिक्षक रवी गायकवाड यांचे मोठे योगदान असून आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सराव सुरू आहे. गायकवाड यांच्या मल्लांनी आजवर अनेक मोठ्या कुस्त्या केल्या आहेत. त्यामुळे ते माझ्यासाठी योग्य प्रशिक्षक आहेत.
प्रश्न : पुढील महाराष्ट्र केसरीसाठी कोणती तयारी करणार?
उत्तर : सध्या सहा ते सात तास सराव सुरू आहे. महाराष्ट्र केसरीसाठी याच्यापेक्षा जास्त मेहनत घेणार आहे. मोठ्या स्पर्धेसाठी दहा ते अकरा महिने राहिले आहेत. त्यामुळे त्यापद्धतीची मानसिकता तयार करणे सुरू आहे.
प्रश्न : कुस्तीची आवड कशी निर्माण झाली?
उत्तर : वयाच्या सहाव्या वर्सी कुस्ती खेळायला सुरुवात केली. घराण्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. माझे वडीलपण पैलवान होते. त्यांनी अनेक कुस्ती केल्या आहेत. त्यांच्यामुळे मलापण कुस्ती खेळण्याची आवड निर्माण झाली. घरात चुलते, चुलतभाऊ असे आम्ही पंधरा-वीसजण कुस्ती क्षेत्राशी निगडीत आहोत.
प्रश्न : घराण्यात कोणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळली का?
उत्तर : फलटण तालुक्यातील खडकीच्या सूळ घराण्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. सूळ घराण्यातील अनेक मल्लांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, घरात महाराष्ट्र केसरी कोणीही नाही. पण २००२ व २००६, २००७ मध्ये उपमहाराष्ट्र केसरी हा किताब चंद्रकांत सूळ आणि आबा सुळे या दोन मल्लांनी सूळ घराण्यात आणला आहे.
- आई-वडिलांची हीच अपेक्षा...
आई-वडील हे शेतकरी आहेत. तसेच वडील पैलवान होते. त्यांनी अनेक कुस्त्या केल्या आहे. पण त्यांनी महाराष्ट्र केसरीसारखी मोठी स्पर्धा खेळली नाही. आपला मुलगा हा महाराष्ट्र केसरी व्हावा,अशी त्यांची अपेक्षा असून, त्याचबरोबर हिंद केसरीचा किताब जिंकावा.
- असा आहे विकासचा आहार...
दररोज सकाळी पाच वाजता उठल्यावर १०० बदमाची थंडाई, त्यानंतर आठ वाजता कुस्ती खेळून आल्यानंतर परत १०० बदमाची थंडाई. रात्री सराव केल्यानंतर पुन्हा १०० बदमाची थंडाई. त्याबरोबर दररोज सफरचंद, केळीचा नाष्टा सकाळी असतो.
- शासकीय सेवत काम करायचंय..
सध्या पंढरपूर येथे दहावीत शिकत आहे. अभ्यास करत कुस्तीचे धडे गिरवत आहे. आतापर्यंत शालेय राज्यस्तरीय व इतर कुस्त्या भरपूर केल्या आहेत. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यश मिळवून गावाचं आणि जिल्ह्णाचं नाव मोठं करायचं आहे. त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रातून शासकीय सेवत काम करायची इच्छा आहे.
- महाराष्ट्र केसरीचा अनुभव कसा..
आतापर्यंत शालेय कु स्त्या व आयोजित केलेल्या स्पर्धेतील कुस्त्या केल्या आहेत. पण या कुस्त्यांना किती लोकांची उपस्थिती आहे. त्यावर ठरते की कुस्ती कशी होणार आहे. पण महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील कुस्ती मोठी होती. पण मनात भीती आणि जिंकण्याची जिद्दी होती.