पुढील हंगामात चार चिमण्या पेटण्याची शाश्वती
By admin | Published: February 26, 2015 08:38 PM2015-02-26T20:38:41+5:302015-02-27T00:20:18+5:30
फलटण तालुक्यात : ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार
आदर्की : फलटण तालुक्याचा पूर्व भाग स्वतंत्रपूर्ण काळात नीरा उजव्या कालव्यामुळे बागायती झाला. तर दक्षिण व पश्चिम भाग स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतर बागायती होऊ लागल्यामुळे औद्योगिक वसाहतीबरोबर न्यू शुगर वर्क्स व श्रीराम साखर कारखाने आहेत. लोकनेते हिंदुराव निंबाळकर साखर कारखाना पूर्णत्वाकडे आहे. कापशी येथील लोकमान्य साखर कारखाना उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे पुढील हंगामात चार चिमण्या पेटणार असल्याने ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे.फलटण तालुका कायम दुष्काळी असताना फलटणचे मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी नीरा उजव्या कालव्यासाठी प्रयत्न करून पूर्व भाग बागायती केल्याने नगदी पिकाबरोबर उसाचे क्षेत्र वाढू लागल्याने फलटण येथे श्रीराम साखर कारखाना सहकारी तत्त्वावर उभारला. त्याबरोबर न्यू शुगर वर्क्स साखरवाडी येथे त्यांनी त्यावेळी सहकार्यातून खासगी कारखाना आपटे उद्योग समूहाने उभा केला.त्यामुळे गुळाची गुऱ्हाळे ही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे उसाचे गाळप होत होते; परंतु दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे होऊन छोटी-मोठी धरणे बांधल्याने पाणीसाठा होऊ लागल्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ होऊन उसाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे कारखाना पूर्ण क्षमतेने चालवूनही ऊस शिल्लक राहू लागला. त्यानंतर श्रीराम साखर कारखाना आजारी पडल्याने न्यू शुगर वर्क्सवर ऊस गाळपाची क्षमता कमी असल्याने शेजारचे साखर कारखाने ऊस नेत असत. दराची शाश्वती नसायची नंतर श्रीराम साखर कारखाना जवाहर उद्योग करार तत्त्वावर दिल्याने उसाचे गाळप होऊ लागले. परंतु दुष्काळी भागात धोम-बलकवडीचे पाणी बाणगंगेपर्यंत पोहोचल्याने उसाचे क्षेत्र वाढले. त्याबरोबर न्यू शुगर वर्क्सने प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची गाळप क्षमता वाढवली आहे. परंतु श्रीराम कारखान्याची यंत्रणा कासव गतीने सुरू असल्याचे उसाला तुरे आले आहेत. धोम-बलकवडीचे पाणी वेळेत दुष्काळी भागात येत असल्यामुळे उसाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे.
स्वराज्य इंडियाचे संचालक रणजित निंबाळकर यांनी सीतामाईच्या पायथ्याला माण फलटणचे उसाचे कार्यक्षेत्र लक्षात घेऊन उपळवे येथे लोकनेते हिंदुराव नाईक- निंबाळकर यांनी सीतामाईच्या पायथ्याला माण-फलटणचे उसाचे कार्यक्षेत्र लक्षात घेऊन उपळवे येथे लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याची वर्षात उभारणी करून गत महिन्यांत कारखान्याचे बॉयलर पेटवले.
चांगला हंगाम घेण्याचा ही त्यांचा मानस आहे. कापशीच्या माळावर लोकमान्य साखर कारखान्याचे भूमिपूजन झाले. काम युद्धपातळीवर सुरू असल्याने फलटण तालुक्यात पुढील हंगामात चार चिमण्या पेटणार असल्याचे ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)