निंबळकच्या तलाठ्याला दुसऱ्यांदा लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 09:25 PM2018-06-15T21:25:29+5:302018-06-15T21:25:29+5:30

 Nimbalkar's robbery arrested for the second time in cash | निंबळकच्या तलाठ्याला दुसऱ्यांदा लाच घेताना अटक

निंबळकच्या तलाठ्याला दुसऱ्यांदा लाच घेताना अटक

Next

सातारा : लाच प्रकरणाचा एक खटला न्यायप्रविष्ट असताना निंबळक, ता. फलटण येथील तलाठी श्रीमंत दिनकर रणदिवे (वय ४७, रा. फलटण) याला एक हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दुसºयांदा रेव्हिन्यू क्लब, फलटण येथे रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मार्डी, ता. माण येथे २०१२ मध्ये तलाठी म्हणून काम करत असताना श्रीमंत रणदिवे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वडूज विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. दरम्यान, श्रीमंत रणदिवे फलटण तालुक्यातील मिरढे येथे तलाठी असून, निंबळक येथील अतिरिक्त कार्यभारही त्याच्याकडे आहे.

तक्रारदार महिलेने निंबळक गावठाण क्षेत्रात जागा खरेदी केली होती. ती नावावर करण्यासाठी रणदिवे महिलेकडे पैशांची मागणी करत होता. त्यानंतर महिलेने रणदिवे याच्या विरुद्ध सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. शुक्रवारी दुपारी पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांच्या पथकाने सापळा रचला. फलटण येथील हॉटेल रेव्हिन्यू क्लब, फलटण येथे महिलेकडून रणदिवे याने एक हजाराची लाच स्वीकारली, त्याचदरम्यान लाचलुचपत विभागाने त्याला पकडले. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे, पोलीस नाईक संजय साळुंखे, प्रशांत ताटे, विशाल खरात व श्रद्धा माने यांनी सहभाग घेतला होता.


यापूर्वी स्वीकारली होती ५०० रुपयांची लाच
मार्डी, ता. माण येथे तलाठी म्हणून कार्यरत असताना तक्रारदाराने खरेदी केलेल्या दस्ताची नोंद करण्यासाठी रणदिवे याने ५०० रुपयांची मागणी केली होती. ती स्वीकारताना त्याला पकडले होते. काही काळ निलंबित केल्यानंतर पुन्हा तो कामावर रुजू झाला. सध्या याप्रकरणी वडूज विशेष न्यायालयात खटला प्रलंबित आहे.

... तर सेवेतून बडतर्फ
लाच घेताना सापडल्यानंतर संबंधित अधिकाºयाला निलंबित केले जाते. त्यानंतर अन्य ठिकाणी त्याची बदली केली जाते. या ठिकाणी त्याला निम्म्या पगारावर काम करावे लागते. तसेच न्यायालयातील खटल्याच्या तारखेला हजरही राहावे लागते. न्यायालयाचा निकाल लाचखोराच्या विरोधात गेल्यावरच शासन त्याला सेवेतून बडतर्फ करते. तलाठी श्रीमंत रणदिवे हा निलंबन काळातच काम करीत असताना दुसºयांदा सापडला आहे. त्यामुळे आता शासन त्याला सेवेतून कायमचे बडतर्फ करणार की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Web Title:  Nimbalkar's robbery arrested for the second time in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.