बेपत्ता चालकाचा खून केल्याचे निष्पन्न

By admin | Published: June 23, 2015 11:50 PM2015-06-23T23:50:12+5:302015-06-24T00:48:08+5:30

गुड उकलले : वाई तालुक्यात आसलेजवळ ऊसाच्या फडात मृतदेह दिला पेटवून

Nine killed in missing driver's death | बेपत्ता चालकाचा खून केल्याचे निष्पन्न

बेपत्ता चालकाचा खून केल्याचे निष्पन्न

Next

शिरवळ : ‘गोव्याला फिरायला जायचे आहे,’ असे सांगून भाड्याने घेतलेल्या कारवरील बेपत्ता चालकाचे गुड उकलण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. कार भाड्याने घेतलेल्या तिघांनी चालकाचा खून करुन मृतदेह वाई तालुक्यातील आसलेजवळ ऊसाच्या फडात पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह तिघांना अटक केली आहे.शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील भाऊसाहेब खोमणे यांच्याकडील कार (एमएच १२ केएन ११६५) ही गोव्याला नेण्यासाठी सोमवार, दि. १५ रोजी रात्री आठच्या सुमारास घेऊन गेले होते. त्यावेळेस खोमणे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गुरुवार, दि. १८ पर्यंत गाडी घेऊन पुन्हा शिरवळला आणण्याचे ठरले. दरम्यान, खोमणे यांनी १५ ते १८ पर्यंत चालक लक्ष्मण आबासाहेब जाधव (वय २६, रा. शिरवळ मुळ रा. उपळाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. यावेळी खोमणे यांनी शनिवार, दि. २० रोजी शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात चालकाचे अपहरण केल्याची फिर्याद दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तपास केला. यातून मोठ्या शिताफीने बावधन येथील विकास अनिल जाधव (२०), विलास लालसिंग गायकवाड (२३) व एका अल्पवयीन मुलाला सोमवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखविताच संबंधितांनी चालक लक्ष्मण जाधव याला उंब्रज हद्दीत भाड्यावरुन झालेल्या वादावादीतून चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची कबूली दिली. जाधव याच्या मृत्यूची खात्री पटल्यानंतर संबंधितांनी मृतदेह आसलेजवळील एका ऊसाच्या फडात टाकला. (प्रतिनिधी)


पथकाला बक्षिस जाहीर
या घटनेचा ७२ तासांत तपास लावलेल्या पथकातील पोलीस जवानांच्या कार्याची अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दखल घेतली असून त्यांना बक्षीस देण्याचे घोषित केले आहे.
बेपत्ता चालक लक्ष्मण जाधवचा खून प्राथमिक दर्शनी भाड्याच्या वादातून झाल्याचे दिसत असले तरी तपासात त्याला अनेक कांगोरे असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यात आणखी कोण सामील याचा आहेत, याचा शोध सुरू आहे.

Web Title: Nine killed in missing driver's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.