साडेनऊ लाखांची चोरीची कीटकनाशके जप्त नारळवाडी : कºहाड शहर पोलिसांकडून दोघांना अटक

By Admin | Published: May 15, 2014 12:18 AM2014-05-15T00:18:00+5:302014-05-15T00:18:31+5:30

कºहाड : कºहाड शहर पोलिसांनी बुधवारी नारळवाडी, ता. पाटण येथून ९ लाख ६0 हजार ४२0 रुपये किंमतीची चोरीची किटकनाशके जप्त केली.

Nine people worth Rs. 9 lakhs seized from pistol | साडेनऊ लाखांची चोरीची कीटकनाशके जप्त नारळवाडी : कºहाड शहर पोलिसांकडून दोघांना अटक

साडेनऊ लाखांची चोरीची कीटकनाशके जप्त नारळवाडी : कºहाड शहर पोलिसांकडून दोघांना अटक

googlenewsNext

कºहाड : कºहाड शहर पोलिसांनी बुधवारी नारळवाडी, ता. पाटण येथून ९ लाख ६0 हजार ४२0 रुपये किंमतीची चोरीची किटकनाशके जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेली किटकनाशके बायोक्लेम प्रकारची आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना खबर्‍याकडून दत्त चौकात चोरीच्या किटकनाशकांची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अविनाश वणवे यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह माहिती जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना दत्त चौकातील शिवसृष्टी संकुल इमारतीत असणार्‍या ओम एजन्सीसमोर दाघेजण हातात बॉक्स घेऊन संशयास्पद स्थितीत उभे दिसले. याबाबत पोलिसांनी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी बॉक्स उघडून पाहिले असता दोन्ही बॉक्समध्ये बायोक्लेम नावाचे ६0 हजार ४२0 रुपये किंमतीचे किटकनाशकांचे एकूण ५५ डबे आढळून आले. त्या दोघांना पोलीस ठाण्यात नेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी आपली नावे अनिल मारुती खरात ( वय ३२, रा. कोपर्डे हवेली, ता. कºहाड) आणि कृष्णत गोपाळ चव्हाण (वय ३८, रा. नारळवाडी, मल्हारपेठ, ता. पाटण) अशी सांगितली. त्या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ११ एप्रिल रोजी प्रशांत कोकरे (राजाचे कुर्ले, ता. खटाव) याने त्या दोघांकडे बायोक्लेम किटकनाशकांचे एकूण ३५ बॉक्स विक्रीसाठी दिले होते. अटक करण्यात आलेल्यापैकी कृष्णत चव्हाण याला सोबत घेऊन नारळवाडी, मल्हारपेठ येथे लपवण्यात आलेली बायोक्लेमची आणखी ३३ बॉक्स पोलिसांनी जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या ३५ बॉक्सची एकूण किंमत ९ लाख ६0 हजार ४२0 रुपये इतकी आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वणवे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Nine people worth Rs. 9 lakhs seized from pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.