विटांसाठी भांडवल उभे करताना नाकी नऊ व्यवसाय अडचणीत :

By admin | Published: November 19, 2014 10:03 PM2014-11-19T22:03:22+5:302014-11-19T23:20:28+5:30

मजुरी, कच्च्या मालाचे दर वाढल्याचा परिणाम

Nine trades to stand on capital for bricks: | विटांसाठी भांडवल उभे करताना नाकी नऊ व्यवसाय अडचणीत :

विटांसाठी भांडवल उभे करताना नाकी नऊ व्यवसाय अडचणीत :

Next

पिंपोडे बुद्रुक : वीटभट्टी व्यवसायासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. कच्च्या मालाचे आणि मजुरीचे दर वाढल्यामुळे भांडवल उभे करताना वीटभट्टीचालकांच्या नाकी नऊ येत आहे. गुंतवणूक जास्त आणि विटांच्या दरात घसरण अशा कात्रीत हा व्यवसाय सापडला आहे. पिंपोडे बुद्रुक, नांदवळ, वाठारस्टेशन येथे वीटभट्टी व्यवसाय आहेत. या व्यवसायासाठी माती बाहेर गावाहून आणावी लागते. माती खराब लागली तर संपूर्ण भट्टी वाया जाण्याची भीती असते. स्थानिक पातळीवर मजूर मिळत नसल्यामुळे जास्त पैसे देऊन मजूर आणावे लागतात. शिवाय वीज, पाणी या खर्चाचा मेळ घालताना व्यावसायिकांच्या नाकी नऊ येत आहे. त्यातच नैसर्गिक आपत्ती कोसळली तर सगळे भांडवल मातीत जाण्याची भीती असते. (वार्ताहर) वीटभट्टीसाठी कच्च्या मालाचे दर ४माती : ७०० रुपये ब्रास ४दगडी कोळसा : १० हजार रु. टन ४बगॅस : ३ हजार ५०० रुपये टन ४राख : ४ हजार रुपये टन या व्यवसायात मजूर, मालाचा उठाव याबाबत अनिश्चितता, भांडवलाचा अभाव आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा व्यवसाय जिकिरीचा बनत आहे. - सत्यजित लेंभे, व्यावसायिक एक हजार विटा बनविण्यासाठी ४५० रुपये मजुरी एक हजार वीट विक्री ४२०० ते ४५०० रुपये वीटभट्टीवर काम करण्यासाठी मराठवाडा, कर्नाटक येथून कामगार येतात. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात करार करावा लागतो. एका जोडीसाठी ५५ ते ६० हजार रुपये आगाऊ रक्कम द्यावी लागते. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मजूर कामावर येतात. ते कामावर येईपर्यंत शाश्वती नसते. कुणी फसविले तर कायदेशीर कारवाई करावी लागते. तरीही हाती काही लागेल याची शाश्वती नसते.

Web Title: Nine trades to stand on capital for bricks:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.