एकोणसाठ हजार निराधारांना मिळणार प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:11+5:302021-04-18T04:39:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्य शासनाच्या वतीने निराधार वृद्ध, दिव्यांग, विधवा परितक्त्या, अनुसूचित जाती, जमाती अशा लोकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्य शासनाच्या वतीने निराधार वृद्ध, दिव्यांग, विधवा परितक्त्या, अनुसूचित जाती, जमाती अशा लोकांना आर्थिक मदत दिली जाते. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केलेल्या घोषणेनुसार जिल्ह्यामधील ५९३४२ लाभार्थ्यांना मुदतीआधी ही मदत दिली जाणार आहे.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या पाच योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. सातारा जिल्ह्यात ५९ हजार ३४२ लाभार्थ्यांना ही मदत दिली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने लाभार्थ्यांची सुधारित यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक तहसील कार्यालयाकडून ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मागून घेतली आहे. ही यादी शासनाला पाठवल्यानंतर शासनाची आर्थिक मदत थेट या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात होणार आहे.
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
१) पॉइंटर्स
योजना लाभार्थी
संजय गांधी निराधार योजना - ३१६२२
श्रावणबाळ योजना - १८८५१
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना - ७४९६
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना - १२६७
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना- १०६
कोट १
संपूर्ण हयात कष्ट करण्यात गेली. प्रामाणिकपणे काम करत राहिलो; पण तेवढा मोबदला नसल्याने आता हातात पैसा नाही, अशी परिस्थिती आहे. शासनाने श्रावण बाळ योजनेतून आर्थिक लाभ दिल्याने आम्ही जगू शकतो.
- वसंत पवार, लाभार्थी श्रावण बाळ योजना
कोट २
तीस वर्षांचा संसार केला. मात्र, संसार वेलीला फुले फुललीच नाहीत. आता वृद्धापकाळामध्ये काम होत नाही. उपासमारीची वेळ आली तेव्हा कोणीतरी सांगितले शासन वृद्धांना निवृत्तीवेतन देते. या योजनेचा फॉर्म भरल्यामुळे फायदा होत आहे.
- शामराव बाबर, लाभार्थी इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना
कोट ३
जिवंतपणी मरण्यासारखी परिस्थिती आमच्यासमोर उभी राहिली होती, तेव्हाच शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरला. शासनाने हा फॉर्म मंजूर केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक लाभ घेत आहोत.
- संपत जगताप, लाभार्थी संजय गांधी निराधार योजना
कोट ४
मुलगी झाली म्हणून सासरच्या लोकांनी जाच केला. अनेकदा हल्ला करण्यात आला. मुलीला वाचवून मी माहेरी निघून आले. माहेरची परिस्थिती बेताची आहे, तरीही मजुरी करून मुलीला वाढवते. परित्यक्ता निवृत्तीवेतनाचा मला लाभला आहे.
- वसुधा बोराडे, लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
कोट ५
दिव्यांग म्हणून जन्माला आला असल्याने नीट शिक्षणदेखील घेता आले नाही. कुटुंबातील सर्वांनाच माझ्या भविष्याचा प्रश्न होता. मी काही करू शकत नाही, हे मला माहीत होते. मात्र, इंदिरा गांधी निवृत्तीवेतनामुळे मी कुटुंबाचा आधार बनलो आहे.
- संजय शिंदे, लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना