नव्वद टक्क्यांना कळले; आता उरले दहा टक्के; नागरिकांकडून कचऱ्याचे नियमित वर्गीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:37 PM2018-11-14T22:37:47+5:302018-11-14T22:38:04+5:30
सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कचºयाचे योग्य निर्मूलन करता यावे, यासाठी सातारा पालिकेच्या वतीने कचºयाचे वर्गीकरण केले ...
सचिन काकडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कचºयाचे योग्य निर्मूलन करता यावे, यासाठी सातारा पालिकेच्या वतीने कचºयाचे वर्गीकरण केले जात आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलित करताना तो ओला व सुका अशी वर्गवारी करूनच गोळा केला जात आहे. शहरातील जवळपास ९० टक्के नागरिक कचºयाचे वर्गीकरण करीत असून, केवळ दहा टक्के नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. या नागरिकांचे प्रबोधन झाल्यास पालिकेचे कचरा वर्गीकरणाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.
सातारा शहरात जवळपास ३५ हजार मिळकतधारक आहे. शहरातून दररोज सुमारे ७० टक्के कचरा हा घंडागाड्या व टीपरच्या माध्यमातून संकलित केला जातो. या कचºयाची सोनगाव कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते. पूर्वी कचºयाचे वर्गीकरण न करताच तो गोळा केला जात होता. मात्र, स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्यानंतर पालिकेने कचरा निर्मूलनासाठी ठोस पावले उचलली.
याचाच एक भाग म्हणून प्रथम कचºयाची ओला व सुका अशी वर्गवारी करण्यात आली. घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलित करताना तो वर्गीकरण करूनच गोळा केला जाऊ
लागला.
यासाठी पालिकेच्या वतीने नागरिकांचे विविध माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. शहरातील जवळपास ९० टक्के नागरिक आता ओला व सुका असे वर्गीकरण करूनच घंटागाडीत कचरा टाकतात. परंतु केवळ दहा टक्के नागरिक आजही कचºयाचे वर्गीकरण करीत नाहीत.
एकाच पिशवीत ओला व सुका कचरा टाकून कर्मचाºयांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम काहीजणांकडून सुरू आहे. या मूठभर नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे.
पालिकेकडून याबाबत उपाययोजना केल्यास पालिका कचरा वर्गीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असे मत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
कचरा डेपोत खोदले खड्डे
सातारा शहरातून दररोज सुमारे ६० ते ७० टन कचरा संकलित केला जातो. सोनगाव डेपोत हा कचºयाची विल्हेवाट लावली जाती. या ठिकाणी पालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम सुरू असून, याचाच एक भाग म्हणून डेपोत सहा मोठ्या आकाराचे खड्डे खणण्यात आले आहेत. शहरातून दररोज गोळा होणारा कचºयाचे वर्गीकरण करून तो या खड्ड्यांमध्ये टाकला जाणार आहे.