निरा देवघरचे पाणी डेटा बदलून बारामतीला वळविले, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 04:13 PM2023-02-13T16:13:22+5:302023-02-13T16:28:29+5:30

केंद्र सरकार निरा देवघर आणि कृष्णा भीमा प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईल

Nira Deoghar's water data was diverted to Baramati, a serious allegation by Union Minister Gajendra Singh Shekhawat | निरा देवघरचे पाणी डेटा बदलून बारामतीला वळविले, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावतांचा गंभीर आरोप

निरा देवघरचे पाणी डेटा बदलून बारामतीला वळविले, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावतांचा गंभीर आरोप

Next

नसीर शिकलगार

फलटण: निरा देवघर प्रकल्प हा तत्कालीन सरकारने रखडला असून याचे हककाचे पाणी  डेटा बदलून बारामतीला वळविण्याचा गंभीर आरोप केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला. केंद्र सरकार निरा देवघर आणि कृष्णा भीमा प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईल आणि दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न कायमचा सोडवेल अशी ग्वाही मंत्री शेखावत यांनी यावेळी दिली.

रखडलेला निरा देवघर सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याच्या अनुषंगाने व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला मार्गी लावण्याच्या हेतूसाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज, सकाळपासून पुण्यातून हेलिकॉप्टरने हवाई पाहणी केली. यानंतर त्यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदे घेतली. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजीराव पाटील, आ. समाधान अवताडे, माजी आमदार  प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री शेखावत म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न संदर्भात यापूर्वी खासदार नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझ्याशी वारंवार संवाद साधून पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष हवाई पाहणी दौरा करून निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा आढावा घेतला. 

यापूर्वीच्या सरकारने प्रकल्प रखडवला

यापूर्वीच्या सरकारने राजकारण आणून निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प रखडविला होता. तत्कालीन सरकारने प्रकल्प रखडवितानाच स्थानिकावर अन्याय करून निरा देवघरचा डेटा बदलून हे पाणी बारामतीकडे वळविले होते व दिशाभूल केली होती. याचा रिपोर्ट आपल्याकडे आहे असे स्पष्ट करून निरा देवघर सिंचन प्रकल्पाला तीन हजार नऊशे कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिली असल्याने केंद्र सरकार सुद्धा या प्रकल्पासाठी गांभीर्याने निधी उपलब्ध करून देईल व सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न कायमचा संपवून टाकेल असे गजेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले.

अत्यंत सुनियोजित पद्धतीने पूर्वीच्या सरकारने निरा देवघरचे हक्काचे पाणी बारामतीला वळविले होते. याबाबत आपण केंद्र व राज्य सरकारला सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यामध्ये हक्काचे पाणी बारामतीला दिल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून हे प्रकल्प मार्गी लावण्याची ग्वाही शेखावत यांनी दिल्याने पाणी प्रश्न संपुष्टात येईल असे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Nira Deoghar's water data was diverted to Baramati, a serious allegation by Union Minister Gajendra Singh Shekhawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.