कºहाडच्या प्रवेशद्वारावर घुमतोय निर्मळेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:19 AM2019-01-20T01:19:10+5:302019-01-20T01:19:23+5:30

कºहाड : कºहाड शहरात कोठेही कचºयाचा एक तुकडाही पडू नये संपूर्ण शहर स्वच्छ दिसावं म्हणून पालिकेतील प्रत्येक घटकांकडून प्रयत्न ...

 Nirmale Jagar, who traveled through the bay's entrance | कºहाडच्या प्रवेशद्वारावर घुमतोय निर्मळेचा जागर

कºहाडच्या प्रवेशद्वारावर घुमतोय निर्मळेचा जागर

Next
ठळक मुद्दे पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता : ग्रीन स्पेस विकसासाठी धडपड

कºहाड : कºहाड शहरात कोठेही कचºयाचा एक तुकडाही पडू नये संपूर्ण शहर स्वच्छ दिसावं म्हणून पालिकेतील प्रत्येक घटकांकडून प्रयत्न केले जात आहेत. जिथं-तिथं दिसेल तिथं पडलेला कचरा उचलण्याची जणू सवयच पालिकेच्या सफाई कर्मचाºयांना लागली आहे. सध्या शहरातील ग्रीन स्पेसच्या जागांवर स्वच्छतेची मोहीम सुरू असून, शनिवारी कोल्हापूर नाक्यावरील हायवे पुलाखालील मोकळ्या जागेची कर्मचाºयांनी स्वच्छता केली.

कºहाड शहरात उघड्यावर ‘कचरा टाकेल तो दंड भरेल’ असे सांगत पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. कोणी उघड्यावर कचरा टाकताना अथवा घाण करताना दिसला की त्याला पकडून त्यांच्या हातात शंभर ते दीडशे रुपयांची पावती दिली जात आहे. तर दुसरीकडे शहराच्या सुशोभीकरणासाठी पालिकेने जोमाने सुरुवात केली आहे.

‘स्वच्छ कºहाड, सुंदर कºहाड’ बनविण्याच्या दृष्टीने कºहाड पालिकेच्या वतीने पाऊल टाकले असून, गत नवीन वर्षात पालिकेचे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये यश हे उद्दिष्ट्य समोर ठेवले आहे. शहरातील प्रवेशद्वारावरील आयलँडला झळाळी प्राप्त करून देण्यासाठी पालिकेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेची नुकत्यात झालेल्या विशेष सभेत कºहाड शहर स्वच्छ बनविण्याबरोबर पर्यटकांचे आकर्षण वाढावे म्हणून पालिकेकडून शहरातील नऊ ठिकाणे सुशोभीत करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत शनिवारी पालिकेतील सहा कर्मचाºयांकडून कोल्हापूर नाक्यावरील हायवे पुलाखालील मोकळी जागा, लगतचे नाले, आयलँड आदी ठिकाणी साचलेला कचरा एकत्रित केला. सुमारे तीन ते चार तास स्वच्छता मोहीम राबवित प्रवेशद्वार स्वच्छ केला.

रोज करावा लागतो दुर्गंधीशी सामना...
कºहाड पालिकेत सुमारे पाचशेहून अधिक कर्मचाºयांची संख्या आहे. यातील बहुतांश कर्मचाºयांपैकी स्वच्छता, पाणीपुरवठा या विभागातील कर्मचाºयांना जास्त काम असते. यातील स्वच्छता विभागातील कर्मचाºयांना तर दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
पालिकेतील स्वच्छतेचे आम्ही शिलेदार
कºहाड येथील प्रवेशद्वार असलेल्या यशवंतराव चव्हाण स्वागत कमान परिसरात पालिकेतील मारुती काटरे, लक्ष्मण थोरवडे, आकाश वायदंडे, मोहन वायदंडे, नाना सोनावले, संदीप भोसले या सहा कर्मचाºयांकडून स्वच्छता करण्याचे काम नुकतेच करण्यात आले. या शिलेदारांकडून करण्यात आलेल्या स्वच्छतेमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.


कºहाड येथील कोल्हापूर नाक्यावरील यशवंतराव चव्हाण स्वागत कमानीलगतच्या हायवेच्या पुलाखालील मोकळ्या जागेची शनिवारी पालिका कर्मचाºयांनी स्वच्छता केली.

Web Title:  Nirmale Jagar, who traveled through the bay's entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.