वाठार स्टेशनच्या सरपंचपदी निता माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:54 AM2021-02-25T04:54:03+5:302021-02-25T04:54:03+5:30
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशनच्या सरपंचपदी निता माने, तर उपसरपंचपदी अनिल माने यांची बिनविरोध निवड झाली. वाठार ...
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशनच्या सरपंचपदी निता माने, तर उपसरपंचपदी अनिल माने यांची बिनविरोध निवड झाली.
वाठार स्टेशन येथील ग्रामपंचायत सदस्यांची संख्या १३ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत श्री समर्थ महाविकास आघाडीला १० जागा मिळाल्या होत्या, तर भाजप पुरस्कृत जनकल्याण विकास पॅनलला तीन जागा मिळालेल्या आहेत. बुधवारी सरपंच व उपसरपंचपदाची निवड झाली. सरपंचपदासाठी महाविकास आघाडीच्या निता संजय माने यांचा एकच अर्ज दाखल झाला, तर उपसरपंचपदासाठी महाविकास आघाडीकडून अनिल राजेंद्र माने यांचा, तर भाजप पुरस्कृत जनकल्याण विकास पॅनलकडून सचिन जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. दरम्यानच्या काळात सचिन जाधव यांनी उपसरपंचपदाचा अर्ज माघारी घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या निता माने यांची सरपंच म्हणून, तर उपसरपंचपदी अनिल माने यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यशेंद्र क्षीरसागर यांनी काम पाहिले. वाठार स्टेशनचे तलाठी एन.बी. नाळे व ग्रामविकास अधिकारी पी. एन. ढाणे यांनी सहकार्य केले.
या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मंत्री सतेज पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, विजयराव कणसे, भीमराव पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती रूपाली जाधव, पंचायत समिती सदस्या मंगला गंगावणे, अंकुश जाधव, हमीदखान पठाण, नागेश जाधव, अमोल आवळे, संजय भोईटे आदींनी अभिनंदन केले.
फोटो दि. २४ वाठार स्टेशन सरपंच फोटो...
फोटो ओळ : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशनच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक झाली. या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (छाया : संजय कदम)
.......................................................