लॉकडाऊनमध्ये प्रवेशबंदी, आता मतांसाठी गावाला या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:39 AM2021-01-13T05:39:58+5:302021-01-13T05:39:58+5:30

कातरखटाव : खटाव तालुक्यातील कातरखटाव, एनकूळ, बोबाळे, तडवळे, बनपुरी, येरळवाडी, कनसेवाडी, कान्हरवाडी या भागातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला ...

No access to lockdown, now come to the village for votes! | लॉकडाऊनमध्ये प्रवेशबंदी, आता मतांसाठी गावाला या !

लॉकडाऊनमध्ये प्रवेशबंदी, आता मतांसाठी गावाला या !

Next

कातरखटाव : खटाव तालुक्यातील कातरखटाव, एनकूळ, बोबाळे, तडवळे, बनपुरी, येरळवाडी, कनसेवाडी, कान्हरवाडी या भागातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला असून, प्रचार शिगेला पोहोचला आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये गावबंदी करणारे उमेदवार, कार्यकर्ते, मतदानासाठी गावाला या म्हणून आता हात जोडून विनवणी करीत आहेत.

ग्रामीण भागातील अनेक लोक मुबंई, पुणे व इतर शहरांमध्ये कामानिमित्त वास्तव्यास आहेत. परंतु, कोरोना महामारीच्या काळात अडीच महिने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. सारे व्यवहार, वाहतूक, बंद होती. रुग्णांची वाढती संख्या लोकांच्या मनात भीती, अफवा पसरवत होत्या. त्यावेळी या लोकांना गावाकडे यायचे होते. तेव्हा गावाकडील नागरिकांना शहरातील नागरिकांची भीती वाटत होती. चाकरमानी गावाकडे येण्यासाठी धडपडत होता. परंतु, अनेक गावांमध्ये प्रवेशबंदी लादली गेली. त्यावेळी चाकरमानी चांगलेच त्रस्त झाले होते. गावातील कार्यकर्ते, नागरिकांना चाकरमानी परका वाटत असल्याचे विनोदी संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आणि म्हणूनच, ‘गल्ली ते दिल्ली’ असे समीकरण असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे मतांचा जोगवा मागण्यासाठी व मतांची जुळवाजुळव करण्यासाठी कार्यकर्ते, उमेदवारांना मुबंई, पुणे येथे जाऊन मतदारराजा कुठे आहे, ते शोधावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

अशा तऱ्हेने तालुक्यासह कातरखटाव, एनकूळ, बनपुरी, तडवळे या हुकमी आणि मोठ्या गावांत निवडणूक चुरशीची होणार असून, ग्रामपंचायतींची सत्ता आपल्याच पक्ष व गटाला कशी मिळेल, यासाठी आ. जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांची प्रतिष्ठा गनिमी काव्यानुसार पणाला लागणार आहे, असे दिसून येत आहे.

त्यामुळे उमेदवार नमस्कार, करीत असला तरी जिल्ह्याचे व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कातरखटाव, एनकूळ, बनपुरी, येरळवाडी, तडवळे, या गावात मतदारराजा चमत्कार, घडवणार असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.

(चौकट)

दोन ग्रामपंचायती बिनविरोध तर काही ठिकाणी आटापिटा...धराधरी?

या भागातील मानेवाडी, डाळमोडी येथील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बोबाळे ग्रामपंचायत एकमताने बिनविरोध झाली होती. परंतु, यावेळी एकमत नसल्याने कार्यकर्त्यांत धराधरीचे रामायण घडले गेले तर दुसरीकडे अटीतटीच्या बनपुरी गावात दोन उमेदवारांच्या घोळामुळे निवडणूक लढवावी लागत आहे. त्यामुळे या भागातील निवडणुका रंगतदार वळणावर येऊन ठेपल्या आहेत. गावगाडा हाकताना आजी-माजी सरपंच, कार्यकर्ते, उमेदवाराच्या पायाला भिंगरी असल्याचे दिसून येत असून मी अमक्या वाॅर्डात आहे, मी तमक्या वाॅर्डात आहे, असे चित्र पहावयास मिळत आहे.

Web Title: No access to lockdown, now come to the village for votes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.