एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:12+5:302021-03-10T04:38:12+5:30

वनश्रीनगर (ता. कऱ्हाड) येथे शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. ओंडच्या सरपंच मनीषा ...

No child will be out of school! | एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही!

एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही!

Next

वनश्रीनगर (ता. कऱ्हाड) येथे शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. ओंडच्या सरपंच मनीषा माने, केंद्रप्रमुख सदाशिव आमणे, मुख्याध्यापिका शारदा माने, शोभा पोळ, राजेंद्र लादे, सचिन राजमाने, वसंत जाधव, प्रदीप रवलेकर, प्रतिभा पाटील यांची उपस्थिती होती.

अ‍ॅड. शरद पोळ म्हणाले, एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, असे शासनाचे धोरण आहे. यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. २०१५ मध्ये महासर्वेक्षण झाले होते. त्यानंतर परत एकदा शाळाबाह्य मुलांचा शोध शिक्षण विभागाला घ्यायचा आहे. आपला तालुका शाळाबाह्य विद्यार्थीमुक्त कसा होईल, याकरिता सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.

सचिन राजमाने यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र लादे यांनी आभार मानले.

फोटो : ०९केआरडी०१

कॅप्शन : वनश्रीनगर (ता. कऱ्हाड) येथे शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणास पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. शरद पोळ यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

Web Title: No child will be out of school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.