ठोस कार्यक्रम हवा, नुसत्या बाता नको! : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 09:52 PM2018-10-15T21:52:36+5:302018-10-15T23:03:57+5:30

‘दरवर्षीप्रमाणे तेच ते टंचाई आराखडे सादर न करता प्रत्यक्ष टंचाईवर कशी मात करता येईल, याच्या उपाययोजना करा. प्रत्यक्ष गाव पातळीवर जाऊन टंचाई निवारण्याचा ठोस कार्यक्रम हाती घ्या.

 No concrete program air, just wipe out! : Vijay Sivatare | ठोस कार्यक्रम हवा, नुसत्या बाता नको! : विजय शिवतारे

ठोस कार्यक्रम हवा, नुसत्या बाता नको! : विजय शिवतारे

Next
ठळक मुद्देफलटण येथील टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना कानपिचक्यातलाव कोरडे असतील तर त्याचे खोलीकरण करावे, रुंदीकरण करावे.

फलटण : ‘दरवर्षीप्रमाणे तेच ते टंचाई आराखडे सादर न करता प्रत्यक्ष टंचाईवर कशी मात करता येईल, याच्या उपाययोजना करा. प्रत्यक्ष गाव पातळीवर जाऊन टंचाई निवारण्याचा ठोस कार्यक्रम हाती घ्या. नुसत्या हवेत बाता नको,’ अशा कानपिचक्या पालकमंत्री विजय शिवतारे यांनी घेतल्या.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी आयोजित टंचाई आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, पंचायत समिती सभापती प्रतिभा धुमाळ उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, ‘महाराष्ट्र शासन दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे. फलटण तालुक्यात सध्या काही गावांत टंचाई जाणवू लागली असली तरी शासकीय यंत्रणेने याबाबत ठोस उपाययोजना करावी. मागेल त्या गावाला टँकर द्यावे; पण टँकरशिवाय तेथे पाणी कसे पोहोचेल, याचा विचार करावा. फलटण तालुक्यातून नीरा उजवा कालवा आणि धोम बलकवडीचा कालवा वाहत आहे. कालव्यातील पाण्यावर लगतची तलाव, विहिरी भरून घ्याव्यात.

तलाव कोरडे असतील तर त्याचे खोलीकरण करावे, रुंदीकरण करावे. हे पाणी त्या गावातील तहान भागवण्यासाठी वापरावे, तालुक्यातील तिन्ही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने त्या पुन्हा सुरू कराव्यात. त्यासाठी आवश्यक ती मदत आणि सहकार्य मदत आणि पुनर्वसन मंत्रालयातर्फे करण्यास तयार आहोत.फलटण तालुक्यात जनावरांची संख्या व चाºयाची उपलब्धता याची माहिती पालकमंत्री शिवतारे यांनी विचारली असता चारा आणखी दहा महिने पुरेल इतका उपलब्ध असल्याचे संबंधित अधिकाºयाने यावेळी स्पष्ट केले.

संतप्त आमदारांनी धरले धारेवर
आमदार दीपक चव्हाण हे शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. मात्र सोमवारी नीरा उजवा कालव्यामध्ये गरज असताना पाणी अधिकारी सोडत नसल्याने ते चांगलेच संतापले. लोकांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पिके जळू लागली आहेत. तुम्ही का वेळेवर पाणी सोडत नाही?’ असे त्यांनी संबंधित अधिकाºयाला खडसावले. यावर ‘कालवा दुरुस्तीचे किरकोळ कामे सुरू असल्याने पाणी सोडले नाही,’ असे अधिकाºयांनी सांगताच आमदार चव्हाण यांचा पारा आणखी चढला. यावेळी शिवतारे यांनी हस्तक्षेप करीत ‘तातडीने पाणी सोडा. कामे वेळेवर उरकत जावा. प्रलंबित कामांची टेंडर काढण्यात अडचण असेल तर सांगा,’ असे सुनावले.

वीज कनेक्शन तोड़ू नका
महावितरणने टंचाई काळात कोणाचेही वीज कनेक्शन तोड़ू नये. शासकीय योजनांची थकबाकी असेल तर संबंधित मंत्रालयांशी बोलून मार्ग काढू. कोणत्याही शेतकºयांचे, शाळांचे कनेक्शन तोड़ू नका, असे आदेश महावितरणला दिले.


नीरा देवघरच्या पाण्यावर चुप्पी
नीरा देवघरच्या प्रलंबित कामाबाबत तसेच याचे पाणी बारामतीला पळविले जात असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर पालकमंत्री यांनी फारसे काही न बोलता. वेळ निभावून नेली. यावर ‘तुम्हीही नीरा देवघरचे खातेदार आहात. तुमची जमीन या भागात असल्याने मार्ग काढा,’ असे त्यांना पत्रकारांनी सांगताच त्यांनी स्मितहास्य करून आवरते घेतले.


 

Web Title:  No concrete program air, just wipe out! : Vijay Sivatare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.