ग्राहकच नसल्याने स्ट्रॉबेरी शेतातच पडून ; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:55 PM2020-03-31T23:55:16+5:302020-03-31T23:56:24+5:30

शेतकऱ्यांना यंदा सुरुवातीपासून पावसाने अडचणीत आणले आहे. पुन्हा त्यात बदलत्या हवामानाचा फटका, धुके, अवकाळी पाऊस आणि आता कोरोना विषाणूचा झटका बसल्याने शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे

 With no customers, strawberries fall into the field; Farmers are excited | ग्राहकच नसल्याने स्ट्रॉबेरी शेतातच पडून ; शेतकरी हवालदिल

पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी न तोडताच शेतात पडून राहिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Next
ठळक मुद्दे कोरोनाचा असाही फटका : तोडही झाली नसल्याने पाचगणीतील उत्पादक अडचणीत

दिलीप पाडळे ।

पाचगणी : कोरोनाचा फटका जगभरातील अनेक देशाला बसला आहे. मोठी शहरंही लॉकडाऊन झाली आहेत. माणसं घरात बसली आहेत. त्यामुळे उद्योग जगताला फटका बसत असताना त्यातून स्ट्रॉबेरीही सुटलेली नाही. ग्राहकच नसल्याने पाचगणीत स्ट्रॉबेरी शेतातच पडून आहे. कवडीमोलही दर मिळत नसल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

याबाबत माहिती अशी की, व्हायरसच्या संसर्गजन्य रागाने सर्वत्र आपले हातपाय पसरले आहेत. सर्वत्र बाजारपेठांत झालेली लॉकडाऊन परिस्थिती व अवकाळी पावसाचा कहर यामुळे स्ट्रॉबेरी हब म्हणून प्रचलित असलेला पर्यटनस्थळांचा महाबळेश्वर तालुका लॉकडाऊन झाला. यामुळे स्ट्रॉबेरीला ग्राहकच मिळत नाहीत. त्यामुळे तोडीविना स्ट्रॉबेरी शेतातच पडून राहिल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. स्ट्रॉबेरीवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या, सोसायट्यांनी ही स्ट्रॉबेरी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
कोरोना व्हायरसचा पादुर्भाव अधिकच वाढल्याने पाचगणी, महाबळेश्वर पर्यटनस्थळे लॉकडाऊन झाली आहेत. त्यामुळे नेहमी गजबजलेली पर्यटनस्थळे पर्यटकांविना ओस पडली आहेत. लाल चुटूक फळाला पर्यटक स्थानिक बाजारातून खरेदी करीत होते. त्यात आता सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने स्ट्रॉबेरी स्थानिक बाजारात विकली जात होती.

त्याचबरोबर सोसायटीला घातली जात होती. आता स्थानिक मार्केट बंद झाल्याने व सोसायटी स्ट्रॉबेरी घेत नसल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. शेतकऱ्यांना यंदा सुरुवातीपासून पावसाने अडचणीत आणले आहे. पुन्हा त्यात बदलत्या हवामानाचा फटका, धुके, अवकाळी पाऊस आणि आता कोरोना विषाणूचा झटका बसल्याने शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शेतकरी स्ट्रॉबेरी विकलीच जात नसल्याने स्ट्रॉबेरीची तोड करीतच नाहीत. त्यात सोसायटी घेत नाही, त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.


कवडीमोल किंमतही मिळेना...

नोव्हेंबर डिसेंबरमध्ये चारशे ते पाचशे रुपये दराने विक्री होणारी स्ट्रॉबेरीला आता कवडीमोलही किंमत मिळत नाही.
यावर्षी सततच्या संकटांनी शेतकरी मात्र आर्थिक गर्तेत पडणार आहे.

 

कोरोनासदृश्य परिस्थितीमुळे स्ट्रॉबेरी तोड होताच झाडांनाच स्ट्रॉबेरी फळ पडून आहेत. स्थानिक मार्केट बंद झाल्याने तसेच सोसायट्याही स्ट्रॉबेरी घेण्यास तयार नसल्याने आम्ही आर्थिक खाईत लोटले जाणार आहोत. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. यावर तातडीने शासन स्तरावरून निर्णय होण्याची आवश्यकता आहे.
- राजेंद्र कासुर्डे,
स्ट्रॉबेरी उत्पादक, पाचगणी.

Web Title:  With no customers, strawberries fall into the field; Farmers are excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.