एकही कुटुंब पंचनाम्यापासून वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:21+5:302021-07-31T04:39:21+5:30

सातारा : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना राज्य शासन व प्रशासन मदत करीत आहे. सध्या विविध विभागांच्या माध्यमातून नुकसानीचे ...

No family should be deprived of Panchnama | एकही कुटुंब पंचनाम्यापासून वंचित राहू नये

एकही कुटुंब पंचनाम्यापासून वंचित राहू नये

googlenewsNext

सातारा : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना राज्य शासन व प्रशासन मदत करीत आहे. सध्या विविध विभागांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. या पंचनाम्यात एकही बाधित कुटुंब वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

अतिवृष्टीमुळे बाधितांसाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे ज्या गावांची पाण्याची योजना वाहून गेली किंवा खराब झाली आहे, अशा गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशा सूचना करून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, ज्या गावांचा दळण-वळणाचा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. तिथे तात्पुरता रस्ता तयार करावा तसेच ज्या गावांमध्ये वीज नाही, त्या गावांमध्ये महावितरण कंपनीने तत्काळ काम सुरू करून लाईटची व्यवस्था करावी.

चौकट..

अतिरिक्त कुमक घ्या...

पंचनामा करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी कमी पडत असतील तर जिथे अतिवृष्टी झाली नाही, अशा तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी यांची मदत घ्यावी. शेतीचे पंचनामे करत असताना शेतकऱ्यांच्या खासगी विहिरींचेही पंचनामे करावेत, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत केल्या.

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही, अशा तालुक्यातील शाखा अभियंत्यांची मदत घ्यावी. तसेच पंचनाम्याची अंतिम यादी तयार करत असताना यादी स्थानिक आमदारांना दाखवावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केल्या.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनाबाबत धोरण निश्चित करावे. तसेच ज्या गावांना भूस्खलानाचा धोका आहे, अशा गावांनी पुढे यावे, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची व प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीत उपस्थित आमदारांनी उपयुक्त अशा सूचना केल्या.

फोटो नेम : ३०डीआयओ

फाेटो ओळ : सातारा येथील नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सूचना केल्या.

Web Title: No family should be deprived of Panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.