रस्त्यांच्या कामात हालगर्जीपणा नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:26 AM2021-07-16T04:26:57+5:302021-07-16T04:26:57+5:30

श्रीनिवास पाटील : राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा कऱ्हाड : रस्ता हा विकासाचा आरसा असतो. त्यामुळे रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व ...

No hassle in road works! | रस्त्यांच्या कामात हालगर्जीपणा नको!

रस्त्यांच्या कामात हालगर्जीपणा नको!

Next

श्रीनिवास पाटील : राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा

कऱ्हाड : रस्ता हा विकासाचा आरसा असतो. त्यामुळे रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हायला हवीत. रस्त्याच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा करू नये, अशी सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

कऱ्हाड-चिपळूण व आदर्की-लोणंद या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. सारंग पाटील, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, श्रुती नाईक, महेश तागडे, शत्रुघ्न काटकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, कऱ्हाड ते चिपळूण मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांमधून तक्रारी होत आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली पाहिजे. त्यासंदर्भातील त्रुटी दूर करून मार्गातील आवश्यक सुधारणा कराव्यात. ज्या-ज्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याला तडे गेले आहेत त्याठिकाणी अपघात होण्याच्या शक्यता अधिक आहेत. त्यामुळे तेथे तातडीने दुरुस्ती करावी. याशिवाय रस्त्यादरम्यान अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यात यावीत. लोणंद ते आदर्की मार्गाच्या सुस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. रस्त्यांची गुणवत्ता आणि दर्जाबाबत कोणत्याही तडजोडी करू नयेत.

दरम्यान, स्वत: जिल्हाधिकारी राहिलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी रस्त्याच्या कामातील कमतरता अचूक हेरल्या. कामावर बारकाईने लक्ष देण्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. तर नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी वेळेत काम पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. दोन्ही कामाबाबत आसपासच्या ग्रामस्थांच्या असणाऱ्या तक्रारी सोडविल्या गेल्या पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फोटो : १५केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाड-चिपळूण व आदर्की-लोणंद या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा खासदार श्रीनिवास पाटील यांनी घेतला.

Web Title: No hassle in road works!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.