कितीही हॉर्न वाजवा... बंड्या शांतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:48 AM2021-02-20T05:48:43+5:302021-02-20T05:48:43+5:30

साताऱ्यातील सर्वच प्रमुख मार्गावर वाहनांची वर्दळ वाढळी आहेत. त्यावर मोकाट गायी, कुत्री फिरत असतात. शहर पोस्ट कार्यालयासमोर गायी, तर ...

No matter how much you blow the horn ... Bandya is quiet | कितीही हॉर्न वाजवा... बंड्या शांतच

कितीही हॉर्न वाजवा... बंड्या शांतच

Next

साताऱ्यातील सर्वच प्रमुख मार्गावर वाहनांची वर्दळ वाढळी आहेत. त्यावर मोकाट गायी, कुत्री फिरत असतात. शहर पोस्ट कार्यालयासमोर गायी, तर इतर ठिकाणी कुत्री बसलेली असतात. ते सरकावेत म्हणून कितीही हॉर्न वाजविले तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. (छाया : जावेद खान)

फोटो नेम 05जावेद०1

०००००

कोरोनामुळे धास्ती

सातारा : जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागात प्रशासनाने कितीही आवाहन केले तरी नियमांचे पालन केले जात नव्हते. आता कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. आता एकमेकांना फोन करून काळजी करण्याचे आवाहन केले जात आहे.

०००००

बारशालाही गर्दी

सातारा : कोरोना रुग्ण कमी असले तरी धोका कमी नाही, काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन करत होते. तरीही लहान-मोठे सोहळे आयोजित केले जात होते. बारसे, वाढदिवस, लग्न समारंभात ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक नातेवाईक, मित्रांना बोलावले जात होते. त्यामुळे अनेकांना कोरोना आजाराला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

०००००

मास्क विक्रीत वाढ

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मास्कला मागणी वाढत आहेत. काही सामाजिक संस्थांतर्फे मास्कचे मोफत वाटप केले जात आहेत.

००००००००

शेतकऱ्यांमध्ये चिंता

सातारा : साताऱ्यासह ग्रामीण भागात बुधवारी रात्री ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. तसेच गुरुवारीही दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

००००००००००

पाणी पातळीत घट

सातारा : साताऱ्यातील पश्चिम भागातील व्यंकटपुरा, चिमणपुरा, मंगळवार तळे परिसरात पाणीपुरवठा करत असलेल्या महादरे तलावातील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. हे पाणी जास्तीत जास्त दिवस टिकून राहावे, यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणी कपात केले आहे.

००

रथसप्तमी निमित्ताने बाजारपेठ फुलली

सातारा : रथसप्तमी आज, शुक्रवारी साजरी होत आहे. यानिमित्ताने महिला सकाळी दूध उकळून उतू घालत असतात. शहरातील महिलांना यासाठी शेणी उपलब्ध होत नाहीत. ही गरज लक्षात घेऊन ग्रामीण भागातून महिला मोठ्या संख्येने शेणी घेऊन येत आहेत. राजवाडा परिसरात शेणी, बोळकी विक्रीसाठी आले असून त्यांना मागणीही वाढत आहे.

०००००००

ऑनलाईनला खो

सातारा : साताऱ्यातील अनेक शाळांनी कोरोनापासून ऑनलाईन शिक्षणप्रणाली अंगीकारली होती. मात्र, आता शाळा सुरू झाल्या आहेत. मुलंही येत आहेत. त्यामुळे काही शाळांनी ऑनलाईन गृहपाठ पाठविण्याचे कमी केले आहे. मुलांनीच शाळेत येणे अपेक्षित मानले जात आहे.

०००००

चौकोन गायब

सातारा : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसमोर ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राहावे यासाठी चौकोन तयार केले जात होते. त्यामध्ये उभे राहूनच खरेदी करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानंतर या चौकोनांचा वापर करणेही बंद केले आहे.

०००००००

साताऱ्यात ध्वनिप्रदूषण

सातारा : साताऱ्यातील राजपथ, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत असते. या पार्श्वभूमीवर लवकर पुढे जाता यावे म्हणून वाहनचालक विनाकारण सातत्याने हॉर्न वाजत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होत आहे. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

०००

दुचाकींना भगवे झेंडे

सातारा : शिवजयंती शुक्रवारी साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर अवघा सातारा शिवमय झाला आहे. ठिकठिकाणी कमानी केल्या आहेत. अनेक दुचाकींना झेंडे लावले आहेत. शहरातून धावणाऱ्या या गाड्या पाहून मुलेही सायकलीलाही झेंडे लावून गल्लीतून फिरत आहेत.

००००

नेत्र तपासणी शिबिर

सातारा : साताऱ्यातील एका सामाजिक संस्थेच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी सॅनेटायझरची सोय करण्यात आली होती.

Web Title: No matter how much you blow the horn ... Bandya is quiet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.