आता कोणीच नाही राहणार उपाशी; केशरी शिधापत्रिकांनाही सवलतीत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:18+5:302021-05-29T04:28:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्य सरकारने केशरी रेशनकार्ड धारकांना देखील सवलतीच्या दरामध्ये गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्य सरकारने केशरी रेशनकार्ड धारकांना देखील सवलतीच्या दरामध्ये गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोणीच उपाशी राहणार नाही, असं म्हणायला वाव आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्याला ४४४ मेट्रिक टन गहू आणि ३२३३ मेट्रिक टन तांदूळ शासनाकडून उपलब्ध झालेला आहे. यातील जे धान्य शिल्लक राहील तेच केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात द्यावे, असे शासनाचे आदेश आहेत.
महिनाभरासाठी एक किलो गहू आणि एक किलो तांदूळ कसा पुरणार ? हा प्रश्न असल्याने केशरी कार्डधारक या योजनेचा लाभ घेतीलच असं ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे शासनाने एक किलो ऐवजी महिनाभर पुरेल इतके धान्य सवलतीच्या दरात द्यावे, अशी सामान्यांची मागणी आहे.
जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक
५३२८२८
बीपीएल कार्डधारक : ३८२१६४
अंत्योदय कार्डधारक : २८२२०
केशरी कार्डधारक : १,२२,४४४
केशरीच्या १२२४४४ कार्डधारकांना मिळणार लाभ
१) राज्य व केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब यादीतील लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळतो आहे.
२) केशरी कार्डधारकांना मात्र मोफत धान्य मिळू शकत नाही या पार्श्वभूमीवर सवलतीच्या दरामध्ये एक किलो गहू आणि एक किलो तांदूळ दिला जाणार आहे.
३) आठ रुपये किलो दराने गहू आणि बारा रुपये किलो दराने तांदूळ मिळणार असला तरी तो पुरेसा नसल्याने याचा लाभ किती कुटुंबाला होईल हे निश्चित सांगता येणार नाही कारण एवढ्या धान्यावर कुटुंबाचे पोषण करणं अवघड आहे.
काय मिळणार
एक किलो गहू
एक किलो तांदूळ
कोट..
जिल्ह्यामधील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब यादीमधील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. आता केशरी कार्डधारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य देण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत, त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
- स्नेहा किसवे -देवकाते, जिल्हा पुरवठा अधिकारी
फोटो आहे