फलटणमध्ये ‘नो पार्किंग’ झोन

By Admin | Published: July 28, 2015 09:28 PM2015-07-28T21:28:32+5:302015-07-28T21:28:32+5:30

पोलीस अधीक्षकांची सूचना : मुख्य रस्त्यांवर सम-विषम तारखांत गाड्या उभारणार--लोकमत इफेक्ट

'No parking' zone in Phaltan | फलटणमध्ये ‘नो पार्किंग’ झोन

फलटणमध्ये ‘नो पार्किंग’ झोन

googlenewsNext

फलटण : फलटण शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगबाबत ‘लोकमत’ने वारंवार उठविलेल्या आवाजाची दखल घेतली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात पार्किंग-नो पार्किंगबाबतची अधिसूचना अखेर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जारी केल्याने शहरवासीयांमध्ये समाधान पसरले आहे. ‘लोकमत’वृत्ताचे कौतुक होत आहे.फलटण शहरात बोकाळलेल्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडीला जनतेला सामोरे जावे लागत होते. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली होती. वाहतूक कोंडी व रस्त्यांवर अतिक्रमणामुळे होणाऱ्या जनतेच्या विशेषत: वाहनचालकांच्या समस्यांचा पाडाच ‘लोकमत’ने सोमवार, दि. २७ जुलैच्या अंकात वाचला होता. ‘फलटणच्या रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा पालिका व पोलिसांचे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केला होता. तसेच यापूर्वीही शहरातील पार्किंगबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत ‘नो पार्किंग’ झोन करण्याबाबत वारंवार ‘लोकमत’च्या माध्यमातून आवाज उठविण्यात आल्यामुळे अखेर या वृत्तांची दखल नगरपालिका व खुद्द जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेत वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी अधिनियम १९८८ (१९८८चा ५९) याच्या कलम ११६ (१) (अ)नुसार अधिसूचना काढली
आहे. शहरात काही भागात सम-विषम नो पार्किंग झोन करण्यात आले
आहे.
पार्किंगबाबत नियम केल्यामुळे काही अंशी रस्त्यापुढील वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. तरी अतिक्रमणाबाबत व शहरातील हातगाड्याबाबत आता नगरपालिकेला ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहराला प्रचंड अतिक्रमाणांचा विळखा बसला असून, नगरपालिका लक्ष देत नसल्याने उठसूठ कोणीही अतिक्रमणे करू लागला. या सर्व गोष्टींचा परिणाम रस्ते अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होण्याबाबत झाला आहे. पोलिसांनी पार्किंगबाबत अधिसूचना काढल्याने आता नगरपालिकेलाही काहीतरी करून दाखविण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'No parking' zone in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.