ना भाषण, ना मार्गदर्शन! शिक्षक दिन; राज्यातील १०६ आदर्श शिक्षकांचा साताऱ्यात गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 01:15 AM2018-09-06T01:15:57+5:302018-09-06T01:16:48+5:30
शालेय शिक्षणमंत्र्यांचे भाषण नाही व कोणत्याही मार्गदर्शनविना राज्यातील १०६ आदर्श शिक्षकांचा साताºयात गौरव करण्यात आला.
सातारा : शालेय शिक्षणमंत्र्यांचे भाषण नाही व कोणत्याही मार्गदर्शनविना राज्यातील १०६ आदर्श शिक्षकांचा साताºयात गौरव करण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, अभिनेता आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री, भरत जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम बुधवारी झाला.
शासनाने आॅनलाईन पद्धतीने या पुरस्कारांसाठी निवड केल्याने हे काम पारदर्शकरीत्या झाले आहे, अशी भावना पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी व्यक्त केली.या सोहळ्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मोहनराव कदम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) गंगाधर म्हमाणे, शिक्षण संचालक (प्राथमिक) सुनील चौहान, विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग किरण लोहार, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते. सभागृहाबाहेर रांगोळी काढण्यात आली होती. पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या डोक्याला फेटे बांधलेले होते. सुरुवातीलाच मंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांनी केलेल्या उपक्रमांची माहितीही तावडे यांनी व्यासपीठावर जाण्याआधी पे्रक्षकांत मिसळून घेतली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यासाठी येऊ शकले नाहीत. मात्र यावेळी त्यांचा संदेश असलेली ध्वनीचित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली. अध्यापन आणि अध्ययन या दोन्ही बाबी तंत्रस्नेही असतील तर चमत्कार घडू शकतात. आपले शिक्षक अत्यंत उत्तम पद्धतीने ज्ञानदानाचे काम करत आहेत, असे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा परिचय असणाºया पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुरस्काराची रक्कम विद्यार्थ्यांसाठी
करुंगळे, ता. शाहूवाडी येथील शाळेत कार्यरत असलेले शिक्षक विनायक हिरवे यांनी पुरस्काराची एक लाखाची रक्कम विद्यार्थी निधीसाठी दिली. गेले पंधरा वर्षे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, विविध गुणदर्शन स्पर्धा, पालकांना प्रबोधन, विद्यार्थी दत्तक योजना, आरोग्य किट वाटप, दिवाळी भेट, करिअर मार्गदर्शन, अनाथांचे पालकत्त्व, आदर्श शिक्षक पुरस्कार आदी उपक्रम दुर्गम भागात राबविले जात आहेत. पुरस्काराच्या रकमेतील एक लाखाची रक्कम विद्यार्थी निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उर्वरित दहा हजार रुपये केरळ येथील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.
शिक्षकांमुळेच आम्ही घडलो : बांदेकर, श्रोत्री, जाधव
या सोहळ्यात अभिनेता आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री व भरत जाधव यांनी आपल्या शालेय जीवनाला उजाळा दिला. शिक्षणमंत्र्यांच्या संकल्पनेतून या तिघांच्याही गप्पांचा कार्यक्रम यावेळी झाला. या तिन्ही कलाकारांनी आपापल्या शालेय जीवनाविषयीचे प्रश्न एकमेकांना विचारले. आज आम्ही जे काही आहोत, त्यामध्ये पहिली ते दहावी या शालेय शिक्षण काळात शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आहोत, असे या कलाकारांनी स्पष्ट केले. मराठी शाळा कशा पद्धतीने चांगल्या आहेत, याविषयीच कलाकारांनी भरभरून सांगितले.
या शिक्षकांचा झाला गौरव प्राथमिक शिक्षक
माधवी गमरे, अनुजा चव्हाण, पूजा संखे (मुंबई), हर्षल साबळे (ठाणे), दयानंद मोकल (रायगड), जतिन कदम (पालघर), माधुरी वेल्हाळ, बळीराव सरपणे (पुणे), लता गवळी (अहमदनगर), नागनाथ येवले (सोलापूर), नानासाहेब कुºहाडे (नाशिक), सतीश शिंदे (धुळे), चंद्रकांत सपकाळे (नंदुरबार), मनवंतराव साळुंखे (जळगाव), विनायक हिरवे (कोल्हापूर), शामराव जुनघरे (सातारा), गोपाळराव होनमाने (सांगली), सुनीता राणे (रत्नागिरी), शामसुंदर सावंत (सिंधुदुर्ग), संजय खाडे (औरंगाबाद), संतोष मुसळे (जालना), सोमनाथ वाळके (बीड), नसिरोद्दीन काजी (परभणी), विनायक भोसले (हिंगोली), संगीता पवार (लातूर), छाया बैस (नांदेड), रंजना स्वामी (उस्मानाबाद), रंजना सोरमारे (नागपूर), अशोक गिरी (भंडारा), नेतराम बिजेवार (गोंदिया), प्रेमानंद नगराळे (चंद्रपूर), नूरखाँ पठाण (गडचिरोली), देवेंद्र गाठे (वर्धा), गजानन कासमपुरे (अमरावती), प्रमोद फाळके (अकोला), अर्जुन वरघट (वाशिम), अनिल चव्हाण (बुलढाणा), विजय विश्वकर्मा (यवतमाळ).
माध्यमिक शिक्षक
पुष्पलता मुळे (मुंबई उत्तर), लक्ष्मण देशमुख (मुुंबई), दयानंद तिवारी (मुंबई द.), भारती हजारी (मुंबई पश्चिम), डॉ. अनिल पाटील (रायगड), स्मिता पाटील (पालघर), अण्णासाहेब पाटील (पुणे), एकनाथ बुरसे (पुणे), अनिल लोखंडे (अहमदनगर), युसूफ शेख (सोलापूर), जयवंत ठाकरे (नाशिक), प्रवीण नेरपगार (धुळे), निमेश सूर्यवंशी (नंदुरबार), डॉ. ईश्वर पाटील (जळगाव), जयवंत सुतार (कोल्हापूर), उत्तम गलांडे (सातारा), विजया जाधव (सांगली), वसंत काटे (रत्नागिरी), संतोष वालावलकर (सिंधुदुर्ग), सुकुमार नवले (औरंगाबाद), शामसुंदर घाडगे (बीड), माधव केंद्रे (परभणी), प्रताप देशपांडे (हिंगोली), शिवलिंग नागापुरे (लातूर), डॉ. मोहम्मद शेख (नांदेड), कुंडलिक पवार (उस्मानाबाद), डॉ. शारदा रोशनखेडे (नागपूर), ओमप्रकाश गायधने (भंडारा), मनोजकुमार राहांगडाले (गोंदिया), महेश डोंगरे (चंद्रपूर), वकील अहमद शेख (गडचिरोली), डॉ. रत्ना चौधरी (वर्धा), गजानन मानकर (अमरावती), जयकुमार सोेनखासकर (अकोला), अजयकुमार मोटघरे (वाशिम), सुनील जवंजाळ (बुलडाणा), अविनाश रोकडे (यवतमाळ).
आदिवासी प्राथमिक शाळा
विजयकुमार दिसले (ठाणे), अनिल जोशी (रायगड), ईश्वर पाटील (पालघर), उत्तम सदाकाळ (पुणे), संतोष फटांगरे (अहमदनगर), विद्या पाटील (नाशिक), नामदेव बेलदार (नाशिक), आबा बच्छाव (नंदुरबार), दशरथ पाडवी (नंदुरबार), साहेबू तडवी (जळगाव), शालिनी सेलूकर (नांदेड), सचिन चव्हाण (नागपूर), दीपक कापसे (गोंदिया), मोरेश्वर बोंडे (चंद्रपूर), विजयकुमार बुद्धावार (गडचिरोली), वासुदेव कुणघाडकर (गडचिरोली), अर्चना मेश्राम (अमरावती)
कला शिक्षक
मोहन देशमुख (पुणे), युवराज राठोड (औरंगाबाद), नीलेश श्ािंदे (नाशिक), अभिमन्यू इबिते (बीड).
गाईड शिक्षिका
भारती पवार (नाशिक)
सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका
संध्या सोंडे (मुंबई), डॉ. तेजस्विनी जगताप (पुणे), वैशाली तेलोरे (नाशिक), नूरजहाँ मुलाणी (कोल्हापूर), पूनम माने (औरंगाबाद), दीपाली सबसगी (लातूर), रेखा दर्वे (नागपूर), विद्या बनाफर (अमरावती).