काळ नाही; पण वेळ आली...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:18 AM2021-02-28T05:18:01+5:302021-02-28T05:18:01+5:30
सातारा : जिल्ह्यात सध्या ऊस वाहतूक जोमाने सुरू आहे. कधी ओव्हरवेट तर कधी रस्ता खराब, कधी शिकाऊ चालक, तर ...
सातारा : जिल्ह्यात सध्या ऊस वाहतूक जोमाने सुरू आहे. कधी ओव्हरवेट तर कधी रस्ता खराब, कधी शिकाऊ चालक, तर कधी समोरच्या वाहनचालकाला वाचविण्याचा प्रयत्न यांमुळे बऱ्याच वेळा ऊस वाहतूक धोक्याची ठरत आहे. असाच प्रकार वर्णे-अंगापूर रस्त्यावर समोरील वाहनचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर व उसाने भरलेली ट्राॅली १० फूट खड्ड्यात उलटली. (छाया : संदीप कणसे)
२७ ऊस वाहतूक
विशेष मुलांना मिळाला आधार
शासनाच्या विविध योजनांसाठी आधारकार्डची नेहमी गरज भासत असते; पण अनेकजण केवळ आधार कार्डअभावी योजनांपासून वंचित राहत असतात. साताऱ्यातील विशेष मुलांच्या आधार कार्डचे नूतनीकरण, आधार कार्डची दुरुस्ती, नावनोंदणीचे मोफत काम, ऑनलाईन आधार कार्डचे काम अमित चव्हाण, एस. एस. शेख यांनी करून दिले आहे. (छाया : जावेद खान)
२७आधार